
अमितच्या या धक्कादायक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उठणार आगडोंब ? का केवळ हा एक धक्कातंत्र उठले प्रश्नाचे काहूर

सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर प्रतिनिधी
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आले आहे. अटकेत असलेला मुख्य आरोपी अमित सुरवसे याने मंगळवारी पहिल्यांदाच आपली वाचा फोडली आहे. अपहरण आणि मारहाण प्रकरणी मला गोवले जात असून, मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडणार असल्याची धक्कादायक माहिती अमित सुरवसेने दिली आहे. आरोपींना जेलमध्ये नेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर सर्व आरोपींना जेलमध्ये नेण्यात आले. नेमक्या त्याच टप्प्यावर अमितने हा मोठा बॉम्बस्फोट केला आहे.

अमित म्हणाला , माझ्यावर केलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. मी या सगळ्या विषयासंदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन समोरा समोर बोलणार असल्याची माहिती मुख्य आरोपी अमित सुरवसे याने दिली आहे. अमितच्या या धक्कादायक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा कट कोणी रचला, यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, कोणाचा यामध्ये आकस आहे, याचा बोलवता धनी कोण ? का केवळ अमितचा हा धक्कातंत्र आहे. असे एक ना अनेक प्रश्न अमितच्या दाव्यानंतर उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पोलिसांची तपास यंत्रणा आता महत्वाची भूमिका बजावणार आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या दाव्यात किती सत्यता आहे हे समोर येणार आहे. जरी अमित सुरवसे याने हा दावा केला असला तरी, तो कशाच्या आधारे केला आहे. हा महत्त्वाचा प्रश्न पोलिसांच्या तपास टप्प्यावर निर्माण झाला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरण हांडे अपहरण प्रकरणी सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अमित सुरवसे आणि श्रीकांत सुरपुरे यांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. मारहाण करुन व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा राग मनात धरुन आरोपी अमित सुरवसे यांनी शरणू हांडेचे अपहरण केले होते. पोलिसांनी ७ पैकी २ आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने सर्व सात ही आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही.ए. कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता सात आरोपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात या गुन्ह्यासंबंधी आणखीन सखोल चौकशी करण्याच्या दृष्टीकोनातून गुन्ह्यातील जप्त वस्तुंचा अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी, मोबाईल अॅनॅलिसीस, हत्यार तसेच ईतर कोणते आरोपी या कटात सामील आहेत का याचा आणखी तपासाच्या अनुषंगाने मुख्य संशयित आरोपी अमित सुरवसे व सह आरोपी श्रीकांत सूरपूरे यांना ३ दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. परंतु आरोपीचे वकील अॅड. शरद पाटील यांनी असा युक्तिवाद केला की, रिमांडमधील अनेक कारणे ही सारखीच आहेत, पोलीस कस्टडी वाढविण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट व योग्य कारण दिलेले नाही. अशा परिस्थितीत पोलीस कस्टडी वाढविणे योग्य होणार नाही. त्यामुळे सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्यधरून पोलीस कस्टडीसाठी योग्य कारणे नाहीत. असे आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करुन सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे.

यात आरोपी अमित सुरवसे यांच्याकडून ॲड. शरद पाटील ईतर आरोपींकडून ॲड. प्रसाद काशिद, श्रीप्रसाद अंकलगी, ॲड. अलीनवाज सय्यद यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे अँड वैशाली बनसोडे यांनी काम पाहिले.
