सेवासदन प्रशाला सोलापूर येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा
जागतिक योग दिवस कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर दि-२२ जून
सेवासदन प्रशाला सोलापूर येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त सेवासदन संस्था येथील बालवर्ग, प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी योग प्रात्यक्षिके व योगासने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या हर्षदा दाते, सेवासदन संस्थेच्या सचिवा वीणा पतकी, धनश्री कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. योगसाधना मंडळातर्फे सेवासदनमधील विद्यार्थिनींकडून वज्रासन, हलासान, वृक्षसन, चक्रासन यांसारखे अनेक योग प्रकार करण्यात आले. यावेळी योगसाधना मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर, कार्याध्यक्ष नागनाथ पाटील, मुख्य कार्यकारी सदस्य रमेश सोनी, सचिवा धनश्री कुलकर्णी, खजिनदार उमा झिंगाडे, अनिता मोहिते, सविता देशमुख, उषा दस्तूरकर, भाग्यश्री चेळेकर, धनश्री मोरे, मनीषा औरंगाबादकर, शहनाझ चामडीया, सुवर्णा चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थिनी यांनी जागतिक योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या सचिव वीणा पतकी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, माध्यमिक विभाग प्रमुख राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापक नंदिनी बारभाई, पर्यवेक्षक स्वाती पोतदार, प्राथमिक विभाग विभाग प्रमुख संजीवनी नगरकर, बालवर्ग विभाग प्रमुख संगीता आपटे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपाली बोरसे यांनी केले.