नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नक्कीच यश मिळेल ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे प्रतिपादन !
सेवा फाऊंडेशनच्या वतीने विशेष प्रवीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा झाला सन्मान…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२२ जून
इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सेवा फाउंडेशनच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदरचा सेवा करिअरचा महाकुंभ हा भव्यदिव्य कार्यक्रम सोलापूरच्या नेहरू नगर येथे पार पडला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, प्राचार्य डॉ.श्रीमंत राठोड, माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड आदींसह शैक्षणिक सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन मेळाव्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रामेश्वर नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना, विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळेल असे प्रतिपादन केले. तर विद्यार्थ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून यशाचे शिखर गाठले पाहिजे. यश तुमच्या हातात आहे. असे मोलाचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
दरम्यान, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी शिक्षणाचा कास धरून आदर्श विद्यार्थी व्हा असे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर आयोजक प्रकाश राठोड यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण ठरविलेले ध्येय गाठू शकतो. असे सांगून उत्तम भारतीय नागरिक होता येईल का? याचा देखील विचार करायला हवा असे मत व्यक्त केले. तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ.श्रीमंत राठोड यांनी केली. तद्नंतर १० वी,१२ वी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी विविध अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी व त्यांचे संचालक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायक आकाश चव्हाण यांनी शैक्षणिक व भक्ती गीतातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सेवा फाउंडेशनचे प्रवक्ते मिथुन राठोड यांनी केले.
यावेळी शहर प्रमुख शिवसेना सचिन चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, माजी नगरसेविका शैलजा राठोड, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपा सदस्या संपदा जोशी, ज्येष्ठ नेते राम तडवळकर, भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, दैनिक तरुण भारतचे नितीन कवठेकर,राष्ट्र बंजारा परिषदचे श्रीमंत चव्हाण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड आदींसह विद्यार्थ्यांचे पालक आणि परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.