सेवा फाउंडेशन यांच्यावतीने नूतन भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सत्कार…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१९ मे
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली आहे. या निवडीमध्ये सोलापूर शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सेवा फाउंडेशन यांच्यावतीने नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उद्देशाने जुळे सोलापुरातील इंचगिरी मठ समोर कुबेर कॉम्प्लेक्स येथे जनतेची कामे मोफत निस्वार्थीपणे करण्यासाठी निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे प्रकाश राठोड यांनी नव्याने सुरू केलेल्या सेवा फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये सत्कार संपन्न झाला. यावेळी सेवा फाउंडेशनच्या ममता राठोड यांनी औक्षण करून रोहिणी तडवळकर यांचा सत्कार केला.

प्रारंभी ठाण्याचे निवृत्त सहायक आयुक्त प्रकाश राठोड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी निस्वार्थी मोफत आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. भविष्यात सर्व सामान्य नागरिकांसाठी आपण एक अभ्यासू नेतृत्व शहराला लाभलेल्या आहेत तसेच भारतात राज्यात भाजपची एक हाती सत्ता असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसाठी होईल, असे सांगितले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश राठोड यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव याच्या जोरावर नागरिकांची कामे जलद गतीने होतील. तसेच भविष्यात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जनतेसाठी निस्वार्थीपणे मोफत सेवा फाउंडेशनच्या वतीने महत्त्वाची कामे करीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, भाजपा महिला आघाडी चिटणीस संपदा जोशी,भाजपचे सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण, नेहरू राठोड, उमेश चव्हाण,राजेश चव्हाण, आकाश चव्हाण,तुकाराम राठोड, सागर राठोड,सुरज राठोड, समाजसेविका ममता राठोड, सुमित राठोड,रिंकू राठोड,पूजा राठोड यांची उपस्थिती होती.