सेटलमेंटच्या बदलत्या चेहऱ्याचा प्रतीक उच्चशिक्षित “कुणाल देविदास गायकवाड” ; वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनपर विशेष वृत्तांत…!

सेटलमेंटच्या बदलत्या चेहऱ्याचा प्रतीक असलेल्या उच्चशिक्षित “कुणाल देविदास गायकवाड” यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!

 प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,

 सोलापूर , दि. १५ सप्टेंबर – १८७१ साली इंग्रजांनी, कसलंच भौतिक संचित जमा न करता आल्याने, मिळेल ते काम आणि गुन्हेगारी यावरच उपजीविका असलेल्या कायमच्या भटकंतीमुळे परिघाबाहेरच राहिलेल्या कैकाडी, भामटा, कंजार भाट, मांग गारूडी, टकारी , पारधी, पामलोर, बेस्तर रजपूत, छपरबंद अशा अनेक जमातींना जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित करून त्यांना गावाबाहेर, लोकवस्तीच्या दूर तारेच्या कुंपणात बंदिस्त केले.

          तत्कालीन मुंबई इलाख्यात अशा ५२ सेटलमेंट होत्या. त्यांना कामासाठी रोज चौकीत नोंद करून बाहेर जाता येई, पण तरी रोज चारवेळा पोलिसांत हजेरी द्यावी लागे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांच्या गुन्हेगारी जमाती कायदे अंतर्गत देशभरातील सेटलमेंटच्या तारेच्या तुरुंगामध्ये अनेक भटक्या जाती जमाती बंदिस्त होते. २७ व २८ फेब्रुवारी १९५२ रोजी संसदेमध्ये संसदेमध्ये या जमाती मुक्त करत आहोत अशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केली होती. सोलापुरात स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूनी येऊन तारेच्या तुरुंगाचे कुंपन कापून सेटलमेंट वसाहत मुक्त केले.

   

     याच सेटलमेंट वसाहतीतील तारेच्या कुंपणात आयुष्यभर राहिलेले पणजोबा बुध्दप्पा, आजोबा कृष्णा उर्फ पांडुरंग ज्यांचा जन्म तारेच्या कुंपणातच झाला, ते पहिली दुसरी शिकलेले आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. त्यांचे चिरंजीव देविदास आणि इतर भावंडे यातील देविदास हा रांगडा गडी, बंडखोर प्रवृत्तीचा, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा देविदास लहानपणापासून मिळेल ते काम करत एम. कॉम. पर्यंत शिक्षण घेऊन तसेच क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील कब्बडी स्पर्धेत भाग घेतला नावलौकिक मिळविला. शेती व्यवसाय करीत अतिशय चांगल्या प्रकारे कुटुंबाचा गाडा चालवीत आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण दिले.

 त्यातीलच एक ” कुणाल, ज्या सेटलमेंट ला माजी गुन्हेगार समाजाची वसाहत म्हणून ओळखली जायची त्या सेटलमेंट मधील हिरा ज्याने उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे नोकरी व्यवसाय करत आत्ता एस. आर .एम. युनिव्हर्सिटी चेन्नई  येथून अत्याधुनिक तंत्रज्ञानमध्ये संशोधन करत आहेत. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने आपल्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. म्हणतात ना, भूतकाळाचे स्मरण ठेऊन, वर्तमान काळाचे विचार करून भविष्याचा वेध घेता येतो त्यांचाच भविष्यकाळ उज्वल असतो.

          आज समाजातील उच्च विद्याविभूषित आणि संपन्न अवस्थेत जगणाऱ्या किती तरुणांना समाजाशी, समाजातल्या प्रश्नांशी स्वारस्य वाटते, त्याच्याशी ते जोडले गेलेले आहेत. पण कुणाल गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत चांगला समाज घडविण्यासाठी, युवकांच्या विकासासाठी मार्गदर्शन करणे, नवीन वाटा, नवे उद्योग, नव्ये संधी निर्माण करण्यास सहकार्य करणे, लोकांना मूलभूत सोयीसुविधा मिळवून देणे, त्यांच्या अडचणीला मदत करणे तसेच आणि आपल्या समाजाला सन्मानाने कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

 सेटलमेंटच्या बदलत्या चेहऱ्याचा प्रतीक म्हणून कुणाल गायकवाड यांना म्हणायला हरकत नाही. सेटलमेंट मधील कुणाल गायकवाड सारखे अनेक युवक युवती चांगले शिक्षण घेऊन शासकीय निमशासकीय, खाजगी उद्योगात, व्यवसायात चांगल्या प्रकारे जम बसवून सेटलमेंटची जुनी ओळख पुसत आहेत.

        भूतकाळाचे स्मरण ठेऊन, वर्तमान काळाचे विचार करून भविष्याचा वेध घेता येतो, त्यांचाच भविष्यकाळ उज्वल असतो समाजास प्रेरित करणाऱ्या कुणाल गायकवाड आपले भविष्य उज्वल असून आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….. !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *