ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ डिसेंबर
ज्येष्ठ पत्रक़ार तथा दैनिक तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांना पुण्यातील जिव्हेश्वर प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या हस्ते पिसे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खान्देशातील ज्येष्ठ पत्रकार, सहकार व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते स्व.माधवराव साळी यांच्या स्मृत्यर्थ प्रतिष्ठानकडून जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला होता. पिसे गेली चार दशके पत्रकारिता क्षेत्रात बातमीदार, उपसंपादक आणि संपादक म्हणून माध्यमात कार्यरत आहेत. पत्रकारितेमध्ये या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला आहे. पत्रकार पिसे तरुण भारतमध्ये प्रारंभीपासून कार्यरत होते. तसेच रा.स्व. संघाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक व ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रबोधन मंचच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे डॉक्टर चंद्रशेखर बारगजे, नरेंद्र गायकवाड अंबरनाथ ढगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.