नवगतांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज : विविध शाळांमध्ये साजरा होणारा प्रवेशोत्सव
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेनंतर चिमुकल्या उन्हाळा सुट्ट्या लागल्या होत्या त्या सुट्ट्या आता संपल्या असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शहरातील विविध शाळांमध्ये नवगत विद्यार्थ्यांसह नियोजित विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहे त्यासाठी शहर जिल्ह्यातील विविध शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सज्ज झाले आहेत. नियमित विद्यार्थ्यांचे आणि नवगतांचे स्वागत करण्यासाठी शाळेत वर्ग सजवण्यात शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व्यस्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या वर्गखोल्या उघडून स्वच्छ केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना कोणताही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी शाळेसह वर्गखोल्या आणि वर्ग खोल्यांच्या वरांड्यात स्वच्छता केली जात आहे. वर्गातील तसेच वर्गाबाहेरील फलक स्वच्छ करून त्या रंगवल्या जात आहेत फळ्यांवर वेलकम काढून फुगे आणि रिबीनच्या सहाय्याने संपूर्ण शाळा वर्ग सजवल्याचे दिसून आले.
अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाचे आणि प्रवेशोत्सवाच्या तयारीचे चित्र दिसून आले आहे. शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गखल्या स्वच्छ करण्यात स्वच्छ आणि सजवण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. उद्या शाळेचा पहिला दिवस असल्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहण्यासाठी सदरचे सजावट केली जात आहे तसेच नवगतांच्या स्वागतासाठी देखील सर्व तयारी केल्याचे यावेळी शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आले.