एसबीआय ग्राहक, एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व भारतीय मित्र परिवाराचे धरणे आंदोलन 

एसबीआय मधून भारतीय नागरिकांची लूट काही थांबेना!

एसबीआय ग्राहक, एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व भारतीय मित्र परिवाराचे धरणे आंदोलन 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर, दि.१३ डिसेंबर

भारतीय स्टेट बँकेची स्थापना ब्रिटिश कालीन असून भारतीय लोकांना लुटण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेली बँक आहे. इंग्रज जरी आपलं भारत सोडून गेले असले, तरी एसबीआय मधून भारतीय नागरिकांची लूट काही थांबत नाही, असा प्रकार दिसत आहे.

         एसबीआय म्युच्युअल फंडाचे अधिकारी, एसबीआय म्युच्युअल फंड हे स्टेट बँकेची असल्याचे सांगत, एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये काहीही अडचण निर्माण झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबाबत दायित्व घेईल अशा प्रकारचे वाक्य सांगून गुंतवणूकदारांना दिशाभूल करीत गुंतवणूक घेत आहे. एका पत्राला उत्तर देताना एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाने योजना सुरू करताना सेबीची परवानगी घेतल्याचे नमूद केले आहे. सदरील परवानगी विषयी सेबी यांना पत्रव्यवहार केले असता असे कोणतेही परवानगी दिल्याचे नाकारले आहेत. तसेच एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालय भारतीय स्टेट बँक, बाळीवेस शाखा कार्यालयात उपलब्ध असल्याचे महत्त्वाच्या कागदात उल्लेख केलेला होता, याविषयी अधिक माहिती घेतली असता भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्पष्ट केले की असं कोणताही एसबीआय म्युच्युअल फंडाचा शाखा त्यांच्या कार्यक्षेत्रात नव्हता. या प्रकारांमुळे भारतीय स्टेट बँकेचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. कोणी गुंतवणूकदाराने कमिशन / दंड विषयी अधिक विचारल्यास एकतर त्याचे पैसे परत करायचे किंवा इतर भीती दाखवून त्यांच्याकडून तक्रार नसल्याचे बनावट पत्र घ्यायचे. (सोलापूर येथील SBI, स्टेशन रोड शाखा व्यवस्थापक सौ नीलम देशपांडे आणि ट्रेझरी शाखेचे व्यवस्थापक सौ सरस्वती उंबराजे यांनी तसे केल्याचे पुरावे आहेत.)

      स्टेट बँक स्टेशन रोड शाखा येथे चेक डिपॉझिट केला असता, त्यावर राहुल साळुंखे, एसबीआय विजापूर रोड शाखेचा शिक्का मारून दिले, याविषयी अधिक माहिती विचारले असता एसबीआय स्टेशन रोड शाखा येथील शाखा अधिकारी अनुराधा कपूर यांनी उत्तर दिले की, स्टेशन रोड शाखेचा शिक्का नसल्याने विजापूर रोड शाखेचा शिक्का वापरला. दुसऱ्या एका पत्रात विजापूर रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक उत्तर देताना म्हणाले की, राहुल साळुंखे विजापूर रोड शाखा येथे होता आणि विजापूर रोड शाखेतच चेक डिपॉझिट होऊन येथील शिक्का त्यावर मारल्याचे स्पष्ट केले. एकच कर्मचारी दोन शाखांमध्ये एकाच वेळेस कसा कार्यरत असू शकतो? यात शंभर टक्के काहीतरी घोटाळा आहे.

क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्टेट बँक, अक्कलकोट शाखा, जुळे सोलापूर शाखा आणि तडवळ शाखेमध्ये कोणीही म्युच्युअल फंडाचा अधिकृत कर्मचारी नसताना,  या शाखांमधून म्युच्यूअल फंडाचा व्यवसाय दाखवण्यात आले आणि त्या शाखांना लाखांमध्ये कमिशन देण्यात आलेला आहे. यावरून असे स्पष्ट होते की एसबीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड या दोघांमध्ये अनेक वेळा संगणमत होऊन अनेक गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर वेगवेगळ्या एजंटच्या नावाने (कधी दिशा फायनान्स तर कधी एसबीआय) ब्रोकर दाखवून, कमिशन देण्यात आलेला आहे.

भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा एसबीआय म्युच्युअल फंड च्या सेल्स मीटिंग ला दुबई येथे हजर होते, या विषयी अनेक वेळा पत्र व्यवहार करुन देखील एसबीआय अद्याप उत्तर देण्यास टाळा-टाळ करीत आहे. म्हणून एसबीआय च्या व्यवहारांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

   भारतीय स्टेट बँकेतून खाजगी कंपन्यांचे कामे बंद व्हावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावे, अन्यथा भारतीय मित्र परिवार व सर्व नागरिक आपले भारतीय स्टेट बँकेतील खाते बंद करतील असे सांगितले. आंदोलनकर्ते तर्फे मा. उप जिल्हाधिकारी सौ मनीषा कुंभार मॅडम यांच्याकडे निवेदन दिलेबाबत श्री विजयकुमार अंकम यांनी माहिती दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *