सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर 

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर…

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमसह विविध स्पर्धेचे आयोजन …..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर,  दि.२७ ऑगस्ट – सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा शिवानुभव मंगल कार्यालय येथे  पार पडली. ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे यांच्या अध्यक्षस्थानी सदरची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या इतिवृत्तांताचे वाचन करून आगामी उत्सवासंबंधी साधक बाधक चर्चा केली. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये यंदाच्या गणेशोत्सवाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची तर कार्यवाहपदी आकाश हारकुड व मल्लिनाथ सोलापुरे यांची निवड करण्यात आली.

 

अन्य पदाधिकारी याप्रमाणे

 उपाध्यक्ष – विजयकुमार बिराजदार,महेश मेंगजी,किसन गर्जे, विरेश सक्करगी चक्रपाणी गज्जम,विश्वनाथ गोयल,चिन्मय पाटील

कार्याध्यक्ष -सोमनाथ शरणार्थी

सहकार्यवाह – प्रविण कोनापूरे, अनिल शहापूरकर   

 कोषाध्यक्ष- शिवानंद सावळगी

कार्यालय प्रमुख-दिलीप पाटील

सहकार्यालयप्रमुख- आनंद तालीकोटी ,संतोष खंडेराव

प्रसिद्धीप्रमुख – शिवानंद येरटे

सांस्कृतिक विभाग प्रमुख – रवींद्र आमणे, अशीष उपाध्ये

मिरवणूक प्रमुख – भारत गोटे, संतोष आकुडे ,गिरीश शहाणे, गोवर्धन दायमा, विनायक घंटे

विशेष महिला प्रतिनिधी – सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर, कायदेशीर सल्लागार – मंगला जोशी चिंचोळकर, बसवराज हिंगमिरे

प्रमुख सल्लागार- लता फुटाणे

हिशोब तपासणीस – जी.जी.बोरगांवक

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुयात… 

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नूतन पदाधिकारी बैठकीत गणेशोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर ढोलपथक स्पर्धा,आरास स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.

– विनायक महिंद्रकर, नूतन उत्सव अध्यक्ष 

या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज येरटे, विश्वस्त सुनिल रसाळे, दास शेळके, नरसिंग मेंगजी, संजय शिंदे,श्रीशैल बनशेट्टी, नंदकुमार उपाध्ये, बसवराज येरटे, सोमनाथ मेंडके,  मल्लिनाथ याळगी आणि पदाधिकारी उपस्थित होते. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले तर आभार गौरव जक्कापुरे यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *