श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
सोहळ्या निमित्त या मार्गात बदल
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २९ जून :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक 6 जुलै ते 11 जुलै 2024 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील लोणंद,फलटण शहर, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मार्गक्रमण करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास सोलापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांचा अडथळा येऊ नये यासाठी दिनांक 6 जुलै ते 11 जुलै 2024 पर्यंत अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारान्वये आदेश पारीत केले आहेत. नातेपुते- फलटण मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येऊन ती वाहतूक नातेपुते- दहिगांव-जांब- बारामती मार्गे पुणे या पर्यायी मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच सातारकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदर वाहने शिंगणापूर तिकाटने- दहिवडी मार्गे सातारकडे मार्गस्थ होतील.