अखेर पालकांनी पोलिसात दिलेली तक्रार मागे..!सेंट जोसेफ शाळेत झालेला प्रकार अनावधानाने ;

सेंट जोसेफ शाळेत झालेला प्रकार अनावधानाने ; पालकांनी पोलिसात दिलेली तक्रार मागे..!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.०२ ऑक्टोंबर – सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून शिक्षा करण्यात आली. यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला जबर मार लागला. गेल्या चार दिवसापूर्वी विद्यार्थी वर्गात सतत बोलत असल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला शिक्षा करण्यात आली. यावेळी संबंधित विद्यार्थीच्या पालकांनी तात्काळ शाळेत धाव घेत आपल्या मुलाला घेऊन पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

     दरम्यान पालकांनी असभ्य वर्तन केल्यामुळे शिक्षकांनी याचा निषेध नोंदवण्यासाठी एक दिवस कामबंद आंदोलन केले.  सेंट जोसेफ शाळेतील शिक्षकांनी मंगळवारी संप पुकारून काम बंद आंदोलन केले. मंगळवार (दि.०२) ऑक्टोंबर रोजी सकाळी ११. वाजता विद्यार्थी त्यांचे पालक, सेंट जोसेफ हयस्कुलचे मुख्याध्यापक, तसेच पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. बैठकीत झालेला प्रकार अनावधानाने झाला असून, शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जाते. या शाळेतील विद्यार्थी मोठं मोठया पदावर काम करत आहेत. त्यामुळे चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम हे शाळेतील शिक्षक करत असतात असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. तर आम्ही विद्यार्थी, शिक्षक, शाळेतील कर्मचारी आणि पालकांसोबत कायम सोबत राहू असे पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पालकांनी पाल्याच्या प्रेमापोटी अनावधानाने तक्रार केली.

पालकांच्या गैरसमजुती मधून घटना घडली. आता पालक माफीनामा देऊन पोलिसात दिलेली तक्रार मागे घेत आहेत. अशी घटना भविष्यात घडू नये. शाळेची प्रतिमा मलिन होऊ नये. यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहू. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध हे चांगले राहीतील.

– अण्णासाहेब कोरे, सहशिक्षक सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर.

गैर समजूतीमधून शाळेत घटना घडली 

आमच्याकडून गैर समजूतीमधून शाळेतील शिक्षकाबद्दल तक्रार केली होती. आता गैरसमज दूर झाला असून तक्रार मागे घेत आहे.

– तक्रारदार पालक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *