सोलापूर व्हिजन
सोलापूर सालाबादप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. हा मार्गस्थ झालेला पालखी सोहळा ७०० वारकरी, २५० पताकाधारी, २५० टाळकरी अन् २०० सेवेकरीसोबत बुधवारी, दि. १० जुलै २०२४ रोजी सोलापुरात दाखल होणार आहे.
दि. १०, गुरुवार, दि. ११ व शुक्रवार, १२ जुलै हे तीन दिवस पालखी सोहळा सोलापुरात असणार आहे. सालाबादाप्रमाणे आषाढवारीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगांव संस्थान पालखी मिरवणूक १० जुलै रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर शहरात येणार आहे. पालखी सोलापूर शहरात दोन दिवस मुक्कामास आहे. १२ जुलै रोजी तिन्हेमार्गे पंढरपुरास जाणार असून, मिरवणुकीत ७०० हून अधिक वारकरी संप्रदाय, वाहन, वाद्य, घोडे बॅण्ड पथकाचा सहभाग आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं ३३९ वर्ष आहे.
*असा आहे पालखीचा मार्ग अन् दिनांक*
बुधवार, १० जुलै रोजीचा मार्ग सकाळी ९ वाजता पालखीचे आगमन सोलापूर शहरातील पाणी गिरणी चौकात झाल्यानंतर आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, प्रशासनातर्फे स्वागत होणार आहे. ही पालखी- तुळजापूर वेस कस्तुरबा मार्केट – सम्राट चौक श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर येथे दुपारी १२ वाजता भोजन व विश्रांती नंतर दुपारी २ वाजता सम्राट चौक, बाळी वेसल टेलिफोन भुवन चाटी गल्ली – भुसार गल्ली- कुंभार वेस कन्ना चौक, राजेंद्र चौकमार्गे कुचन प्रशाला येथे आगमन सायंकाळी ५ दरम्यान व मुक्काम.
*गुरुवार, ११ जुलै रोजीचा मार्ग*
कुचन प्रशालेतून सकाळी ६ वाजता पालखीस सुरुवात होऊन पालखी जोडबसवण्णा चौक – पदमशाली चौंक – सिव्हिल हॉस्पिटल बेडर पूल नळ बझार जगदंबा चौंक – लष्कर – सात रस्तामार्गे अपलप मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते ११ दरम्यान आगमन विश्रांती व मुक्काम होणार आहे.