संभाजी आरमारने दिले देवेंद्र कोठे यांना पाठबळ ; विजयाचा केला एकच निर्धार !

संभाजी आरमारने दिले देवेंद्र कोठे यांना पाठबळ ; विजयाचा केला एकच निर्धार !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वातावरण चांगले तापलेले दिसत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत विविध सामाजिक संघटना उमेदवारांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्याच अनुषंगाने संभाजी आरमार संघटनेने सोलापूर शहर मध्य विधानसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए ) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना पाठबळ देत विजयी करण्याचा चंग बांधला आहे. उमेदवार देवेंद्र कोठे यांनी संभाजी आरमार च्या कार्यालयास भेट देऊन अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, संभाजी आरमार ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांवर युवकांचे संघटन करीत जाज्वल्य राष्ट्रप्रेमी कार्य करणारी संघटना आहे.

यावेळी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले, सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय विचार टिकला पाहिजे. हिंदुत्व टिकले पाहिजे. देव, देश, धर्म कार्य करणारा उमेदवार म्हणून देवेंद्र कोठे यांची प्रतिमा आहे. त्यामुळे संभाजी आरमार संघटनेतर्फे देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यात येत आहे, असेही श्री. डांगे यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, सागर सांगवी, सागर ढगे, संतोष कदम, सोमनाथ मस्के, सुधाकर करणकोट आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *