श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : गुरु पौर्णिमेनिमित्त तीनशे किलो फुलांची सजावट

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; ३०० किलो फुलांनी होणार सजावट…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २० जुलै – गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी (दि. २१) सम्राट चौकातील सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी दिली.

      गुरुपौर्णिमे. निमित्त रविवारी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरास ३०० किलो फुलांनी सजावट करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त चाललेल्या गुरुगीता सप्ताहाची समाप्ती रविवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या गुरुपादुकांचे पूजन दिगंबर जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली होणार आहे. दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

              दरम्यान दुपारी ४ वाजता लेखिका विजयालक्ष्मी शिरगांवकर यांचे ‘गुरु महिमा’ या विषयावर प्रवचन होणार आहे. सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सांप्रदायिक भजन होणार आहे. भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *