रोटरी की आशा नवोपक्रम ठरतोय महिलांसाठी लकी……उपक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट महिलांना बनवते स्वावलंबी…

सोलापूर व्हिजन :आशा असेल तर आयुष्य गतिमान होतं आशा निर्माण करण्याचं काम रोटरी करत असते महिलांनी व्यवसायात उतरून यशस्वी उद्योग करावा आणि महिला सक्षम झाल्या पाहिजे ही भावना ठेवून रोटरी क्लब कडून महिलांना आटा चकीचे वाटप करण्यात आले. रोटरी की आशा या उपक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी २ एचपी क्षमतेची ताशी २५ किलो मान्य मसाला बनवता येईल अशी कमर्शियल आटा चक्की देण्यात आली. ३१३२ या रोटरी प्रांताच्या प्रांतपाल रोटरियन स्वाती हेरकल यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

दरम्यान सोलापूर शहरासाठी त्यांनी डिस्ट्रिक ग्रेट मधून राब्बल २७ आटा चक्की मंजूर केल्या, सोलापूर शहरातील सर्व रोटरी क्लब ने गरजू महिलांची काळजीपूर्वक निवड करून या योजनेचा लाभ त्यांना मिळवून दिला आहे. या महिला स्वतःच्या घरात धान्य व मसाले दळून देण्याचे काम करतील, त्याच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना बरदायीनी वरणार आहे. मिल्टन कंपनीच्या या स्वयंचलित मशीन आहेत. या मशीन मध्ये फक्त धान्यच नाही तर मसाले पण दळता येणार आहेत. विविध सात जाळ्यांचा संच देखील यासोबत देण्यात आला. रोटरी जग भर काम करते जेणेकरून लोकांच्या आयुष्यात स्थिरता शांती ऐश्वर्य या सर्व गोष्टी मनुष्यांना मिळाव्या जगामध्ये एक चांगल्या प्रकारचे आयुष्य लोकांना जगाला यावं या दृष्टिकोनातून रोटरी काम करत असते. पोलिओच्या निर्मूलन मध्ये रोटरीचा प्रचंड मोठा सहभाग आहे.रोटरी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते रोटरी इंटरनॅशनल ते रोटरी क्लबचा सदस्य हा मनापासून काम करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून सोलापूर मधील महीलां साठी रोटरी क्लब कडून आटा चक्कीचे वाटप करण्यात येत असल्याचे डॉक्टर चिडगुपकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील गरजू महिलांनच्या व्यवसायाला हातभार लागावा यासाठी या उद्देशासाठी सोलापूर कॉप्स परिवारातर्फे हा कार्यक्रम राबविण्यात आल्याची माहिती स्वाती माणसावाले दिली अतुल चव्हाण आणि आर्य समाज यांच्या पाठबळामुळे हा कार्यक्रम साध्य करू शकलो असेही यावेळी बोलताना मनसावाले म्हणाले.

याप्रसंगी सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन राजन वोरा अतुल चव्हाण उपस्थित होते. याशिवाय विविध क्लबचे प्रेसिडेंट आनंद लोणावत, राकेश उदगीरी, महेश साळुंखे, जान्हवी माखीजाश्रीकांत अंजूटगी, स्वाती मनसावाले, व्यंकटेश सोमाणी, चार्वाक बुरगुल व इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय वा योजनेतील लाभार्थी महिला देखील उपस्थित होत्या. या स्तुत्य उपक्रमामुळे रोटरी सोलापूर परिवाराचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *