Rohit Sharma & Sunil Gavaskar : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची येत्या दोन महिन्यात मोठी परीक्षा असणार आहे. या महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणं. त्यासाठी पाकिस्तान, श्रीलंकेसारख्या संघाचा कडावा प्रतिकार मोडून काढणं गरजेचं आहे.
Rohit Sharma
दुसऱ्या बाजूला 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. भारताचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी देखील रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघावर असणार आहे.
रोहितसमोर भारतात खेळण्याचं आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करून दाखवण्याचं देखील आव्हान असणार आहे. दरम्यान, Rohit Sharma च्या नेतृत्वाबाबत भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
गावसकर म्हणतात, ‘शेवटी तुमचे मुल्यमापन हे तुम्ही किती ट्रॉफी जिंकल्या, किती विजय मिळवले यावरून होणार आहे. या दोन स्पर्धा जिंकल्या तर तो भारताचा महान कर्णधार होईल.’
गावसकरांनी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या सुरू असलेल्या तयारीबाबत देखील आपले मत व्यक्त केले. अनेक जाणकारांच्या मते चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीबाबत असलेला संभ्रम ही मोठी समस्या आहे. मात्र गावसकरांच्या मते भारताकडे अष्टपैलू खेळाडूंची कमतरता असणे हा कळीचा मुद्दा आहे.
ते म्हणाले की, ‘इतर सर्व गोष्टींपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट ही त्या दिवशीचं लक असतं. तुम्ही जर 1983, 1985, 2011 च्या संघाकडे पाहिले तर त्या संघात चांगल्या दर्जाचे अष्टपैलू खेळाडू होते. तुमच्याकडे 7, 8 षटके गोलंदाजी करू शकतील आणि खालच्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतील असे खेळाडू गरजेचे असतात.
त्यावेळेच्या सर्व संघात असे खेळाडू होते. तुम्ही महेंद्रसिंह धोनीचा संघ पाहा, सुरेश रैना, युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग हे सर्व गोलंदाजी करू शकत होते. ही गोष्ट संघासाठी फार महत्वाची होती. त्यामुळे ज्या संघाकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांना चांगली संधी आहे.
तुम्ही गेल्या वर्षीच्या टी 20 वर्ल्डकपमधील उदाहण घ्या. इंग्लंडने गेल्या वर्षाची वर्ल्डकप जिंकला होता. त्यांचेकडे किती अष्टपैलू खेळाडू होते पाहा. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू फार महत्वाचे आहेत.
गावसकर यांनी काही भाग नशिबाचा देखील असल्याचे सांगितले. त्यांनी 2019 च्या वनडे वर्ल्डकपचे उदाहरण दिले. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्धचा सामना त्याच दिवशी संपला असता तर निकाल काही वेगळा असता आणि कोहलीची स्टोरी काही वेगळीत असती.