परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या सोलापूर दौऱ्यावर
सोलापूर बसस्थानकाचा घेणारा आढावा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ फेब्रुवारी
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुधवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता मुंबई विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण व दुपारी १२:०० वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. दुपारी १२:१५ वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा संपन्न होणार आहे. तदनंतर दुपारी २:०० वाजता शासकीय विश्रामगृह येथून हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन होणार आहे. दुपारी २:०० ते ४:०० वाजता बालाजी सरोवर येथे राखीव असणार आहे. सायंकाळी ४:०० वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथून सोलापूर बस आगार व बस स्थानक परिसरास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. या पाहणी दरम्यान सोलापूरच्या सोलापूर एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा संपन्न होणार आहे.
दरम्यान, मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी सोलापूर एसटी विभाग अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत. आढावा बैठकीच्या माध्यमातून सोलापूर विभाग आणि बस स्थानकाची माहिती घेणार आहेत. त्यासाठी एसटी विभागाची सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सोलापूर एसटी विभाग तसेच आगारातील अधिकारी कर्मचारी यांची पूर्व नियोजन बैठक घेऊन मंत्र्यांच्या दौऱ्यासाठीच्या सर्व सूचना देण्यात आल्याची माहिती सोलापूर एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले.
सोलापूर बस स्थानकाच्या पाहणीनंतर परिवहन मंत्री सरनाईक हे सायंकाळी वाजता सोलापूर बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथून एस.टी. ने जिल्हा धाराशिवकडे प्रयाण. रात्रौ ८:४५ वाजता बस आगार येथून सेालापूरकडे प्रयाण. रात्री १०:३० वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन व मुक्काम. गुरूवार ( दि.२०) फेब्रुवारी रोजी हॉटेल बालाजी सरोवर सेालापूर येथून तुळजापूर कडे प्रयाण करणार आहेत.