अपघाताला आळा घालण्यासाठी पथनाट्यातून जनजागृती ; राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा उपक्रम…

अपघाताला आळा घालण्यासाठी पथनाट्यातून जनजागृती ; राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा नवोउपक्रम…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १८ जुलै – दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अपघातावर आळा घालण्याकरिता कलेतून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व कला सेल यांच्या वतीने राष्ट्रीय नेते तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी हा नवोउपक्रम हाती घेतला.

                       यावेळी दयानंद कला शास्त्र महाविद्यालयचे प्राचार्य प्रा.बी. एच. दामजी, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.शिंदे , दयानंद विधी महाविद्यालयाचे – प्राचार्य प्रा.गायकवाड दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे – प्राचार्य क्षीरसागर  तसेच दयानंद विद्यालयाचे एनएसएस विभागाचे प्राध्यापक सुद्धा उपस्थित होते. दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी या पथनाट्यास विशेष उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

सदरच्या पथनाट्यमध्ये महामाया चंदन डावरे , रक्षिता श्रीशैल बळुरगी , बजरंग यादव होटकर , गुरुनाथ विठ्ठल गोडसे, हनुमंत संभाजी सलगर आदी कलाकाराने सहभाग नोंदविला.

  

    याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान  संगीता जोगदनकर , किरण माशाळकर , प्रकाश जाधव , इरफान शेख , नागेश निंबाळकर , सोमनाथ शिंदे , संतोष वेळापुरे,  प्रकाश झाडबुके , प्रकाश मोठे , मईंनोदीईन इनामदार शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे स्वयंसेवक , महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *