आयुक्त खंडपीठाने उद्यान अधिक्षकांची सेवा समाप्तीचे दिले आदेश : माहिती अधिकारात माहिती न दिल्याने ठोठावला ४०००० चा दंड…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २३ जून – महानगरपालिका नगर अभियंता यांनी उद्यान अधीक्षक यांना प्रथम अपिलात 40 हजार शाश्ती दंड लावला,राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांनी माहिती दिली नाही म्हणून महानगरपालिकाचे उद्यान अधिक्षक यांची सेवा संपुष्टात आली असा आदेश दिला. सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी महानगरपालिका उद्यान अधीक्षक यांना माहितीच्या अधिकारामध्ये ट्री गार्ड संदर्भात माहिती मागितली होती परंतु महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षकांनी माहिती दिली नाही सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी प्रथम अपील दाखल केले प्रथम अपीलाच्या सुनावणी वेळी महापालिका अभियंता कारंजे यांनी उद्यान अधीक्षक गैरहजर राहिल्यामुळे त्यांना चाळीस हजार रुपयांचा दंड शास्ती लावले तरीही उद्यान अधीक्षकांनी माहिती दिली नाही सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी द्वितीय अपील राज्य माहिती आयोग खंडपीठाकडे केला त्यात सुनावणी दरम्यान सोलापूर महानगरपालिका उद्यान अधीक्षक गैरहजर राहिले त्यांच्या विरोधात निकाल देताना राज्य माहिती आयुक्त खंडपीठाने त्यांची सेवा संपुष्टात आणली असा आदेश दिला तसे पत्र त्यांनी महानगरपालिकेला अपील करता जयराज नागणसूरे यांना दिले