सरकार एक रुपयेही न घेता कामगारांच्या १३ चाळींचा B-2(सत्ता प्रकार ब ) कमी करून देण्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं वचन
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१३ जानेवारी
प्रभाग क्रमांक 15 येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जुनी मिल आयोजित केलेल्या सभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रभागात असलेल्या जुनी मिल चाळ, लक्ष्मी चाळ,पाटील चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ, वारद चाळ, एनजी मिल चाळ,जुनी पोलीस लाईन, धरमशी लाईन यासह मुरारजी पेठ येथील अन्य कामगारांच्या चाळी व मिळकतींवरती चुकीच्या प्रकारे B-2(सत्ता प्रकार ब) लागल्या मुळे कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आचारसंहिता नंतर तातडीने बैठक लावून हा विषय एकही रुपये शासकीय कर न घेता पूर्णपणे निकाली काढून देण्याचा शब्द महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभेमध्ये दिला.
