आता रामवाडी यूपीसी सेंटरमध्ये पूर्णवेळ डॉक्टर, रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही – मनपा आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांचा इशारा…
यूपीसी सेंटरला भेट देऊन केली पाहणी..
किसन जाधव यांच्या प्रयत्नांना यश…आता रामवाडी यूपीसी सेंटर सर्व प्रकारच्या सुविधांयुक्त होणार सुसज्ज
सोलापूर दि ६ ऑगस्ट – जिल्हा नियोजन भवन येथे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच डीपीसी बैठकीमध्ये आक्रमक होत रामवाडी यूपीसी सेंटर मधील समस्या पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या. यामध्ये रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सायंकाळच्या वेळेस येथील आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसतात,जीएनएम, एएनएम कर्मचारी हे गर्भवती मातेची प्रसुती करतात, तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याची बाब पालकमंत्र्यांना आणि पालिका आयुक्त शितल तेली- उगले यांना निदर्शनास आणून दिली तसेच यूपीसी सेंटरमध्ये सीसीटीव्ही बंद आहेत, ऑपरेशन थिएटर आहे. पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात अश्या गंभीर समस्या विषयी आक्रमक होत किसन जाधव यांनी या बैठकीत समस्या मांडल्या.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किसन जाधव यांची भूमिका ऐकून घेऊन या संदर्भात पालिका आयुक्तांना तत्काळ रामवाडी यूपीएससी सेंटर मधील समस्या दूर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या होत्या. त्यावर मंगळवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी रामवाडी यूपीसी सेंटरला भेट दिली. गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही आरोग्याच्या योजना अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गोर गरीब कुटुंबातील रुग्णांना प्राधान्याने द्याव्यात अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.यावेळी डॉ.राखी माने यांनी किसन जाधव आरोग्य केंद्राविषयीच्या सर्वसमस्या ऐकून घेऊन तात्काळ या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध करू, सर्व सोयी सुविधांयुक्त हे आरोग्य केंद्र या पुढील काळात राहणार आणि नागरिकांना सर्व आरोग्याच्या सुविधा मिळतील अशी ग्वाही त्यांनी जाधव यांना दिली.
यावेळी किसन जाधव म्हणाले की या भागांमध्ये कष्टकरी श्रमिक कामगारांची लोकवस्ती आहे. गोरगरीब रुग्णांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे मोठे हॉस्पिटलचे दर परवडणारे नाही ही बाब लक्षात घेऊन आरोग्याच्या सर्व योजना अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधाचा लाभ गरजू रुग्णांना रामवाडी यूपीसी सेंटरच्या माध्यमातून मिळावी ही आमचं प्रामाणिक मत आहे परंतु येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे हे त्वरित थांबवा. नागरिकांना सुविधा द्या, नागरिकांच्या जीवाशी खेळू नका अशा सूचना देखील किसन जाधव यांनी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याकडे केल्या. दरम्यान सोमवारी सायंकाळी पालिका आयुक्त शितल तेली-उगले,किसन जाधव आणि मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांची बैठक पालिकेत पार पडली. यावेळेस पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी रामवाडी यूपीसी सेंटर मधील आरोग्य संदर्भाच्या समस्या विषयी माहिती घेतली. त्यावर पालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ या आरोग्य केंद्राच्या समस्या सोडवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी डॉ.राखी माने यांनी रामवाडी यूपीसी सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ.अनिल पवार डॉ. शिल्पा शेट्टे, सत्यभागा गायकवाड, सोनाली कारंडे, रिबेका कार्यकारी, विजयालक्ष्मी जमादार, यास्मिन पठाण, रेखा गायकवाड, पुनम जाधव, वणमला शिंदे, विजय कांबळे, पूजा राठोड, स्वप्नाली मोरे, स्वाती कोळी, सरिता पावरा,ललिता पावरा,रिना गायकवाड, तनुजा गायकवाड यांचासह रामवाडी यूपीसी सेंटर मधील कर्मचारी आदींची उपस्थिती होती.