देशाच्या उन्नतीसाठी शांतता व मानवता आवश्यक : शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली सोलापुरात रमजान ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांची सामूहिक नामाज अदा 

सोलापुरात रमजान ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांची सामूहिक नामाज अदा 

देशाच्या उन्नतीसाठी शांतता व मानवता आवश्यक : शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांचा संदेश 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील विविध ईदगाह मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.३१ मार्च

सर्व जगाला मानवतेची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ईदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यामध्ये हजारो मुस्लिम अबालवृद्ध बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केले. सामूहिक नमाज अदा केल्यानंतर आबाल वृद्ध मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक” असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या…

    दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांचा रमजान पवित्र महिना सुरू होता. या निमित्ताने समाज बांधवांनी महिनाभर निर्जल उपवास केले. अल्लाहाच्या उपासनेत स्वतःला अधिक-अधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले. याकाळात अनेक मुस्लिम बांधवांनी पाच वेळेची नमाज अदा केली. यादरम्यान पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वच मशिदीमध्ये वर्दळ पाहावयास मिळत होती. रविवारी संध्याकाळी चंद्र दर्शन घडले. त्यामुळे आज रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता झाली. दरवर्षीप्रमाणे सोमवारी इदगाह मैदानात सामुहिक नमाज पठण सोहळा संपन्न झाला. यावेळी मैदानाकडे येणारे सर्वच रस्ते फुलून गेले होते.

     होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह मैदानावर पारंपारिक डोक्यावर इस्लामी टोपी, नवीन पठाणी कुर्ता अशा पोशाखात हजारो मुस्लिम बांधव एकत्रित जमले होते. यावेळी मुफ्ती काझी सय्यद अमजद अली (शहर काझी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक नमाज पठण झाली. त्यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केले. नमाज अदा करण्या अगोदर अनेक मुस्लिम नागरिकांनी जकात रक्कम दान केली. विशेष दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून शहर काझी यांनी विशेष खुतबा वाचला. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी, भारताच्या उत्तर सर्वांगीण प्रगती करता दुवा अदा करण्यात आली. इदगाह मैदानातून नमाज पठणाच्या सोहळ्या दरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. देशात अमन, शांती कायम ठेवण्यासाठी प्रगतिशील राहावे, अस आवाहन करण्यात आले. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

शहरातील या ईदगाह मैदानावर सामूहिक रमजान ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली 

 

होटगी रोड आलमगीर ईदगाह

रमजानची ही ईद समस्त भारत वासियांसाठी सुख समृद्धीमय असो.देशात एकता अखंडता कायम राहो.एकमेकांच्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवणे,एक दुसऱ्यांबद्दल द्वेष,संशय निर्माण करणे,अफवा पसरवणे,धार्मिक भावना दुखावणे यापासून दूर राहावे.याने अल्लाह तुमच्यावर ना खुश होतो.जर आपण या गोष्टीपासून लांब राहिल्यास अपापसातील वाद राहणार नाही. देशात सर्वधर्मीय लोक एकत्र गुण्या गोविंदाने राहतील, असा संदेश शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी यावेळी दिला.

 

जुनी मिल ईदगाह 

जुनी मिल कंपाउंड येथील आदिलशाही ईदगाह येथे नमाज पठण झाल्यावर खतीब मोहम्मद फजुलुल्लाह यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित रहावे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील. असे कृत्य कोणी करू नये.लक्षात ठेवा अल्लाह आणि त्यांच्या पैगंबरांना अमन आणि एकात्मता पसंद आहे असे आवाहन त्यांनी केले.

आसार मैदान ईदगाह 

आसार मैदान येथे सामूहिक नमाज पठण झाल्यावर इमामसाब सादिक मणियार यांनी दुआ मागितली.यावेळी त्यांनी देशात शांतात रहावी देशात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नयेत,मुस्लिम बांधवांवरील दुःख दूर व्हावेत अशी प्रार्थना अल्लाह कडे करण्यात आली.

जुना आलमगीर ईदगाह (पांगल स्कूल मैदान)

देशात वक्फ बोर्डाचा योग्य वापर करा.आपल्या समाजातील मुलांना उच्च शिक्षण द्या.देशात शांती कायम ठेवा.नाहक कोणालाही त्रास देवू नका असे आवाहन यावेळी डॉ.मौलाना सैय्यद नक्शबंदी यांनी आपल्या प्रवचनातून केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *