
Rakshabandhan 2023 : Rakshabandhan Rules In Marathi: बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. राखी बांधताना किती गाठी माराव्या, बसण्याची दिशा कोणती असावी असे काही नियम नक्की पाळावे, तेव्हा हे काम नक्की करा. Rakshabandhan 2023
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन साजरे केले जाईल तर काही जण भद्राकाळ लक्षात घेऊन गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करतील. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते, रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
Rakshabandhan 2023
बुधवार ३० ऑगस्टला पौर्णिमा सुरू होत आहे. रक्षाबंधनाचा सण पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ४८ मिनिटापासून सुरू होत असून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील. पण, ३० ऑगस्टला भद्राकाळ रात्री ९ वाजता असेल. भद्राकाळात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. पण, तुम्ही भाद्र पूंछमध्ये म्हणजे प्रदोष काळात राखी बांधू शकता. ३० ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते ६ वाजून ३१ मिनिटे या वेळेत राखी बांधता येईल. यानंतर रात्री ९ वाजल्यापासून ३१ तारखेला सकाळी ७ वाजून ०६ मिनिटापर्यंत राखी बांधता येईल.
Rakshabandhan 2023 भद्राकाळात राखी का बांधत नाही
लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रा योग असताना त्याला राखी बांधली होती. रावणाच्या सर्वनाशाला हेदेखील एक कारण होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे भद्रा काळात विशेष काळजी घ्यावी. राहूकाळ आणि भद्राकाळात शुभ कार्य करू नये.
Rakshabandhan 2023 राखी बांधताना ३ गाठी का बांधतात
रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर धागा बांधताना ३ गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी, कारण या ३ गाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही संबोधतात. यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी, दुसरी गाठ सुख, समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी आहे. तसेच काळे कपडे घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे.