प्रसुतीच्या कळा येणा-या महिलेस दिली मायेची ऊब….रेल्वे स्टेशनवरील घटना

सोलापूर लोहमार्ग पोलीसांची उत्तम कामगीरी ; प्रसुतीच्या कळा येणा-या महिलेस दिली मायेची ऊब….

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २३ जुलै – आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने माणुसकी जपली आहे. रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रसव वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला आधार देत अश्विनी रुग्णालयात दाखल केले.

    सोलापूर

लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहीती नुसार गाडी कं. ११०१९ कोणार्क एक्सप्रेस गाडीचे बोगी न बी/४ बर्थ नं ५० वरून गर्भवती महिला सुभद्रा कामेश्वर साहु वय २७ वर्षे रा.भुवनेश्वर ही तिच्या पतीसह प्रवास करीत असताना सदर महिलेस कुईवाडी रेल्वे स्टेशनपासूनच प्रसव वेदना तीव्र झाल्या. रेल्वे गाडीतील ऑन डयुटी टि सी यांनी रेल्वे पोलीसानां संपर्क करताच, तात्काळ स्टेशनवर हजर असेलेले रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परता दाखवली.

     दरम्यान स्टेशनवरील अश्विनी हॉस्पीटलचे ओपीडीतील वैदयकिय अधिकारी यांना सोबत घेवून सदर रेल्वे गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर येताच तत्काळ महिलेची तपासणी करून जास्त त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी अश्विनी हॉस्पीटल सोलापूर येथे पाठविण्यात आले.

             यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहागंडाले म. पो कॉ व नं १४२८, वैष्णवी दबडे म. पो कॉ व नं १४५२ यांनी मोलाची साथ देवून सदर महिलेस मायेचा ऊब दिला.

  सदरच्या मदतीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी ड्युटीस असणारे पोलीस उप निरीक्षक एस एन जाधव, पोलीस उप निरीक्षक एस एल भाजीभाकरे, पो हवा १२०४ आर डी पवार, पो हवा ६८० अ व्ही पाटील, पो कॉ १६८ बनसोडे, पो कॉ १८८ एच एम जाधव , पो. कॉ इंगीले यांचे देखील सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *