पंढरपूरला जात आहे ? मग या आहेत विशेष रेल्वे….

आषाढी वारीसाठी आणखी विशेष गाड्या धावणार…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १२ जुलै – पंढरपुर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आणि वारकरी पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे आणखी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष रेल्वेगाड्या

गाडी क्र . 07515/07516 नागरसोल – पंढरपूर – नागरसोल आषाढी विशेष एक्सप्रेस

गाडी क्र. 07515 नागरसोल – पंढरपूर विशेष एक्सप्रेस ( 1 सेवा) अधिसूचित दिनांक 16.07.2024 रोजी नागरसोल रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी 07.00 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता ला पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहचणार.

गाडी क्र.07516 पंढरपूर – नागरसोल विशेष एक्सप्रेस ( 1 सेवा) अधिसूचित दिनांक 17.07.2024 रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून रात्री 11.55 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 08.00 वाजता ला नागरसोल रेल्वे स्थानकावर पोहचणार.

थांबे – नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी आणि पंढरपूर असे थांबे असणार.

संरचना – ४ स्लीपर, १४ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन एकूण २० कोच असतील असणार

गाडी क्र . 07505/07506 अकोला – पंढरपूर – अकोला आषाढी विशेष एक्सप्रेस

गाडी क्र. 07505 अकोला – पंढरपूर विशेष एक्सप्रेस (1 सेवा) अधिसूचित दिनांक 16.07.2024 रोजी अकोला रेल्वे स्थानकाहून सकाळी 11.00 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.50 वाजता ला पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहचणार.गाडी क्र.07506 पंढरपूर – अकोला विशेष एक्सप्रेस (1सेवा) अधिसूचित दिनांक 17.07.2024 रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून रात्री 09.40 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 08.00 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहचणार.

थांबे :- अकोला,वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा जं, परभणी जं गंगाखेड, परळी वैजनाथ, पारगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूळ, सेराम, चितपूर, वाडी, कलबुर्गी , सोलापूर, कुर्डुवाडी आणि पंढरपूर असे थांबे असणार.

संरचना :- १ तृतीय श्रेणी वातानुकूलित ४ स्लीपर, १७ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन कुल २४ कोच असणार.

गाडी क्र . 07501/07502 आदिलाबाद – पंढरपूर – आदिलाबाद आषाढी विशेष एक्सप्रेस

गाडी क्र. 07501 आदिलाबाद- पंढरपूर विशेष एक्सप्रेस(1सेवा) अधिसूचित दिनांक 16.07.2024 रोजी आदिलाबाद रेल्वे स्थानकाहून सकाळी 09.00 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03.00 वाजता ला पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहचणार.

गाडी क्र.07502 पंढरपूर – आदिलाबाद विशेष एक्सप्रेस(1सेवा) अधिसूचित दिनांक 17.07.2024 रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून रात्री 08.00 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 03.00 वाजता ला आदिलाबाद रेल्वे स्थानकावर पोहचणार.

थांबे :- आदिलाबाद, किनवट, बोधडी बुजरुग, सहस्त्रकुंड, हिमायतनगर,भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा जं, परभणी जं गंगाखेड, परळी वैजनाथ, पारगाव, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टॉऊन , कुर्डुवाडी आणि पंढरपूर असे थांबे असणार.

संरचना :- २ स्लीपर, १४ जनरल २ गार्ड ब्रेक वॅन एकूण १८ कोच असणार.

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक आणि श्रद्धाळू यांनी या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *