पालखी मार्गावरील मरीआई चौक येथील रस्ता खुला करा
अन्यथा ते पोल उखडून काढू : शिवसेनाचा आक्रमक पवित्रा
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २ जुलै – शेगांव बुलढाणा या पवित्र ठिकाणाहून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी दि. 10 ते 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये सोलापूरामध्ये मुक्कामी असते. सदरची दिंडी हि भैय्या चौक मरीआई चौक तसेच तिऱ्हे मार्गे पंढरपूर कडे प्रस्थान करत असते. दरम्यान भैय्या चौक ते मरीआई चौकातील लावलेले लोखंडी पोल हटवण्यात यावेत अन्यथा शिवसेनेकडून ते लोखंडी पूल काढण्यात येतील असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी अप्पर रेल्वे व्यवस्थापक यांना दिला.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) ते मरीआई चौक रेल्वे उड्डाणपुलाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जड वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरला आहे. म्हणून आपणाकडून भर रस्त्यात आपल्या रेल्वे विभागामार्फत लोखंडी खांब रोवण्यात आले आहेत. या खांबा मध्ये सहा फूट अंतर ठेवल्यामुळे वाहनांना हळुवारपणे जावे लागत आहे. त्यामुळे दररोज दोन्ही बाजूस वाहतुकीची कौडी होत आहे. शाळांच्या वेळी शाळकरी मुलांची या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी है खांब न दिसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता सी.एन.एस हॉस्पीटलकडेही जातो. त्यामुळे सदरचा रस्ता हा महत्त्वाचा व रहदारीचा आहे. शेगांव वरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी दि. 10 ते 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये सोलापूरामध्ये मुक्कामी असते. त्यावेळी दिंडी हि भैय्या चौक मरीआई चौक मार्गे प्रस्थान करणार आहे. या दिंडी सोबत घोडे, व पालखी हि असतात. या दिंडी मधील वारकऱ्यांना व त्यांच्या वाहनांना यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे.
ज्यावेळी प्रत्यक्ष उड्डाण पुलाचे काम सुरु होईल, त्यावेळी सदरचे लोखंडी खांब या ठिकाणी लावण्यात यावेत. तूर्तास हे लोखंडी खांब त्वरित काढण्यात यावेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची जबाबदारी आपली आहे. सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित सदरचा रस्ता वारकरी व सर्वसामान्य नागरिकानंसाठी खुला करण्यात यावा. याची नोंद घ्यावी. अन्यथा शिवसेना रोवलेले पोल उखडून काढेन असा इशारा देण्यात आला. यावेळी उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी, शिवसेना संघटक अंबादास चव्हाण, विभाग प्रमुख विष्णू लोंढे, शाखा प्रमुख दादासाहेब गणेशकर, राजू तलाटी, अजय खांडेकर, योगेश सलगर, ऍड.चौधरी, सनी तलाटी, हकीम बुणकी, दत्ता जाधव, अस्लम शेख, रसूल शेख, प्रताप बंडगर शिवसेनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.