काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपाने केलं निषेध….!
डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर केली निदर्शने….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. १४ सप्टेंबर – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान वॉशिंग्टन मधील जॉर्ज टाउन विद्यापीठमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारत देशात सामाजिक अनुकूल ठिकाण बनल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपविण्याचा विचार करेल असे दुटप्पी व कुटील भावना व्यक्त केली.
राहुल गांधी यांचे वक्तव्य घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे अपमान करणारे आहे. त्यांच्या या संविधाना प्रति असलेल्या खोटारडेपणा जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व अनुसूचित जाती मोर्चा कडून निषेध आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, लोकसभा निवडणूक दिशाभूल करणारे काँग्रेसचे चेहरे जनतेसमोर आले आहेत संविधान संपविणार आरक्षण संपवणार असे खोट्या वक्तव्य करून अप्रचार काँग्रेसने केला असे म्हणत या घटनेचे तीव्र निषेध केला.
आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, भाजपाच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात येत आहे राहुल गांधी हे परदेशात जाऊन भारतीय संविधान व आरक्षण बद्दल अपमान जनक वक्तव्य करत आहेत जे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं त्याप्रमाणे भाजपा हा देश चालवीत असून आम्हाला संविधान बद्दल प्रचंड आदर आहे असे ते म्हणाले.
शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले आरक्षण पाठिंबा देणारी भारतीय जनता पार्टी आहे तसेच संविधानाला मजबूत करणारे भारतीय जनता पार्टी आहे राज्यघटना बदलणे किंवा आरक्षण रद्द करणे हे भाजपाचे विचार नसून लोकसभेत, असा अपप्रचार काँग्रेसने केला आणि त्यांच्या मनातील सत्य आज राहुल गांधी हे प्रदेशात जाऊन आणि सत्तेत आल्यास आरक्षण रद्द करू असे सांगत आहेत त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी आ.विजयकुमार देशमुख , आ.सुभाष देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस नारायण बनसोडे, रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, राजा माने, मारेप्पा कंपली , प्रवीण कांबळे, महेश बनसोडे, सुजित चौगुले , श्रीनिवास करली, संजय कोळी, संतोष कदम, जय साळुंखे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.