खा.राहुल गांधींना आषाढी एकादशी वारीचे दिले निमंत्रण : शरद पवारांच्या उस्थितीत झाली चर्चा
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २ जून :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे , धैर्यशिल मोहिते पाटील, संजय दिना पाटील, सुरेश म्हेत्रे उपस्थित होते.
यावेळी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रात पंढरपुर आषाढी पायी वारीची परंपरा आहे. या वारीत सहभागी व्हावे यासाठी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले.