हिंदुस्थानचे प्रधानसेवक नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन… विशेष वृत्तांत
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सशक्त आणि समृध्द असा नवा भारत घडविणारे दीपस्तंभ, जगातील सर्वात लोकप्रिय नेता, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे.गुजरातच्या वडनगरच्या साध्या चहा विक्रेत्यापासून ते जगातील महासत्तांना हेवा वाटणाऱ्या अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. विश्वस्तरावर हिंदुस्थानाला सर्वोच्च मानसन्मान मिळवून देणारे नेतृत्व मा. नरेंद्रजी मोदी यांचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी यानिमित्ताने मांडाव्या वाटतात. प्रखर हिंदुत्ववादी भूमिका उघडपणे स्वीकारणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. शतकानुशतकांची आकांक्षा पूर्ण करत अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराचे भव्य मंदिर निर्माण त्यांनी शक्य केलं. कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला खरी राष्ट्रीय एकात्मता दिली.

आतंकवाद, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करत घुसून मारण्याचे धाडस त्यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने दाखवले. गंगामातेची पूजा करणे, हिमालयात आणि कन्याकुमारी येथे ध्यान करणे अशा कृतीतून अध्यात्मिकतेची श्रेष्ठता त्यांनी जगाला दाखवून दिली.जागतिक पातळीवर कणखर भूमिका घेत अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांसमोर देखील आता “झुकेगा नहीं” अशी राष्ट्राची प्रतिमा बनवली. मजबूत राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था उभारून सीमांवर शत्रूंचे मनोबल खच्ची केले. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा उपक्रमांद्वारे युवकांना नवे क्षितिज दिले.

स्वच्छ भारत अभियान हे लोकचळवळीत परिवर्तित केले. केवळ फोटोपुरते स्वच्छता मोहिमेत दिसणारे नेते गण मा. नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष स्वच्छता करताना दिसू लागले. मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे काढून व्हीआयपी कल्चर त्यांनी संपुष्टात आणले. आर्थिक, औद्योगिक, परराष्ट्र धोरण, विज्ञान-तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत हिंदुस्थानाने ऐतिहासिक झेप घेतली.

आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचा आवाज अधिक बुलंद झाला – आज जग भारताकडे समस्या सोडवणारा देश म्हणून पाहत आहे. भ्रष्टाचारावर अंकुश आणत, सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवली आणि शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवायला सुरुवात केली. आकाशवाणी सारखे सरकारी माध्यम जे पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षिले जायचे, त्या माध्यमाला ‘मन की बात’ द्वारे प्रतिष्ठा आणि गतवैभव प्राप्त करून दिले. छापील भाषणे न करता उपस्थित जनसमुदायाला नवचेतना देणारे, सृजनात्मक संदेश देणारे, वाणीच्या जोरावर अबालवृद्धांना आपलेसे करणारे प्रेरणादायी वक्ते म्हणजे मा. नरेंद्रजी मोदी होय.
एकही दिवस सुट्टी न घेता सतत भारत मातेच्या सेवेला वाहून घेतलेल्या मोदीजींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे फिटनेस आणि ज्या भागात जातात त्या भागातील पेहराव परिधान करून स्थानिक भाषेत संवाद साधत तिथल्या जनतेशी नाळ जोडणे.
देशाची विविधता अंगीकारताना ते स्वतःला “प्रधान सेवक” म्हणवून घेतात, हीच त्यांची खरी ओळख आहे.आज 75 व्या वर्षीही त्यांची ऊर्जा, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा अविचल आहे.भारताला विश्वगुरू बनविण्याच्या वाटचालीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना
शुभेच्छुक :- श्री देवेंद्र राजेश कोठे, भाजपा आमदार सोलापूर शहर मध्य.
लेखन – गुरुशांत (दादा) धूत्तरगावकर माजी नगरसेवक सोलापूर महापालिका.