हिंदुस्तानचे,संपूर्ण जगात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन…

हिंदुस्तानचे,संपूर्ण जगात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

सशक्त भारत-समृद्ध भारत असा नवा हिंदुस्तान घडवणारे दूरदृष्टी असलेले, लोकांच्या मनामनात बसलेले जगातील सर्वात लोकप्रिय म्हणून समजले जाणारे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आज 75 वा वाढदिवस साजरा होत आहे.

गुजरातच्या वडनगरच्या रेल्वे स्टेशनवर साधा चहा विक्रेत्यापासून ते जगातील महासत्ता असणाऱ्याना लाजवेल असे जनहिताची विकास कामे करून पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. जगात भारताला सर्वोच्च मान-सन्मान मिळवून देणारे,भारताकडे करडी नजरने पाहणारे अथवा कडूनितीने नुकसान करू पाहणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा वेळीच दाखवून देणारे, यांचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी वाढदिवस निमित्ताने मांडू इच्छितो. प्रखर हिंदुत्ववाद स्पष्टपणे स्वीकारणारे हे पहिलेच पंतप्रधान असून भविष्यात असे पंतप्रधान होणे शक्य नाही. जवळपास 500 वर्षापासून प्रलंबित असलेले हिंदूच्या मनातील हृदयस्थान असलेले अयोध्या येथील श्रीरामाचे मंदिर उभारून अशक्य ते शक्य करून दाखवले. कलम 370 हटवीत असताना प्रचंड विरोध होत होता परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कलम 370 हटवून दाखवले ज्यामुळे पाकिस्तानला आर्थिक बळ मिळत होते 370 कलम हटवल्याने पाकिस्तानचे कमरडेच मोडले आहे व सध्या जगापुढे भीक मागत फिरत आहे.  आतंकवाद-दहशतवाद याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारण्याचे धाडस फक्त नरेंद्र मोदी साहेब हेच करू शकतात हे जगाला दाखवून दिले.
स्वच्छ भारत अभियान संपूर्ण भारतात राबवून लोक चळवळीतून स्वच्छता अभियान प्रत्यक्ष अंमलात आणली त्यामुळे भारतातील जनतेला एक प्रकारे चांगली सवय लावून दिली. डिजिटल इंडिया,मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया,अशा अनेक उपक्रम राबवून देशातील तरुण पिढीला उद्योजक बनवले. जागतिक पातळीवर अमेरिका सारख्या बलाढ्य देश यांनी 50% टेरिफ लावला तरीपण त्याला न जुमानता *हम भी किसी से कम नही.

हे दाखवून दिले.सर्व शासकीय कार्यालयात ऑनलाइन प्रक्रिया राबवून पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घातलेला असून त्यामुळे शासनाचे पैसे दलालांच्या खिशात न जाता थेट लाभार्थी यांच्या खात्यात जमा होऊ लागले त्यामुळे भ्रष्टाचारी यांची दुकाने बंद होऊ लागली. भारतात सर्वांगीण विकास होण्यासाठी रस्ते महत्त्वाचे असतात त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्याचे जाळे मजबूत बनवले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक हायवे चौपदरी करून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून त्यामुळे अनेक नागरिकाचे प्राण वाचण्यास मदत होत आहे.  देशासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता देश सुजलाम-सुफलाम करण्यासाठी स्वतःची जीवाची परवा न करता अठरा-अठरा तास विदेश दौरे करून प्रगत देशातील तंत्रज्ञान आपल्या देशात आणून देशाला सशक्त भारत बनविण्यासाठी मोलाची कामगिरी करत आहेत. एकही दिवस सुट्टी न घेता सतत भारताच्या जनतेच्या भल्यासाठी सदैव समर्पित असतात असा निस्वार्थी, भारत मातेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पंतप्रधान भविष्यात मिळणार नाही. आज 75 वर्ष होऊनही त्यांच्या चेहऱ्यावर

 

तेज,ऊर्जा,दूरदृष्टी,चाल एवढी प्रखर आहे की एखाद्या तरुण वर्ग यांनाही लाजवेल अशी त्यांची छबी आहे. भारताला समृद्ध करून विश्वगुरू महासत्ता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात हे अधोरेखित आहे अशा जनमानसाच्या मनामनात बसलेले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य देवो, दीर्घायुष्य देवो व भारताला महासत्ता बनवण्यासाठी व सेवा करण्याची संधी मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…

—राजश्री अनिल चव्हाण—
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मा.नगरसेविका सोलापूर महानगरपालिका.
भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भिमराव चव्हाण सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *