भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्री चव्हाण यांना भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मु यांनी दिले भेटीचे निमंत्रण…

सोलापूर जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांना भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मु दिले भेटीचे निमंत्रण…

सोलापूर प्रतिनिधी

नवी दिल्ली राजभवन येथे १८ ऑगस्ट रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपतीताई मुरमू यांचे कार्यालयाकडून भारतातून एकूण 56 लोकांची यादी प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र राज्यातून सोलापूर जिल्ह्यातुन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण सोलापूर महानगरपालिका,सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दामोदर भोसले राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर,हिंगोली जिल्ह्यातून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ कोमल लक्ष्मण चव्हाण

यांना निमंत्रित केले असून महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार, समाजाला आर्थिक बळकट करण्यासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करणे, समाजावर होत असलेले अन्याय दूर करणे,महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी उपाययोजना करणे,तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपतीताई मुरमू यांचे समवेत महत्त्वाची बैठक होणार असून त्यासाठी निवेदन देऊन आदिवासी पारधी समाजाला कुठल्या प्रकारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल यासाठी प्रयत्न असणार आहेत.
सदर भेट घडवून आणण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,भाजपा प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रविंद्रजी चव्हाण साहेब, महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महाराष्ट्र भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष उत्तमराव इंगळे,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री श्री सुदर्शनजी शिंदे यांनी शिफारस केल्यामुळेच आदिवासी पारधी समाजातील वरील पदाधिकारी यांची भेट निश्चित झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाज यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *