प्रभाग ७ मध्ये भाजपय वातावरण ; भव्य दिव्य रॅलीने वाढवला उत्साह

प्रभाग क्रमांक ७ सह संपूर्ण शहरात भाजपच होणार विजयी : पालकमंत्री जयकुमार गोरे 

सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर, दि. १२ जानेवारी –

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७सह संपूर्ण शहरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये हजारोंच्या गर्दीत पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासामुळे नागरिकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही सोलापूरच्या विकासाची लढाई असून या लढाईत विजय भाजपाचाच होणार आहे. दरम्यान, पालकमंत्री गोरे व आमदार कोठे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

 

प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या प्रभागात कमळ फुलवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांसह भाजपचे कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, भाजपाचे उमेदवार पद्माकर काळे, उत्तरा बरडे-बचुटे, श्रध्दा पवार, आनंद कोलारकर यांनीही नागरिकांच्या भेटी घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले.

 

रविवारी पत्रा तालीम, सळई मारुती, पंजाब तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, चौपाड, शिंदे चौक, नवजवान गल्ली, लोणार गल्ली, काळी मशीद, दाते बोळ, बाबा कादरी मशीद, बाजीअण्णा मठ या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आले होते.

यावेळी पुरुषोत्तम बरडे, श्रीकांत घाडगे, दत्तात्रय कोलारकर, अमर दुधाळ, सचिन शिंदे, बजरंग जाधव, देविदास बनसोडे, सुरज बंडगर, जयवंत सलगर, काटकर, महेश बोकन, सतीश कुदळे, शेखर फंड, सतीश प्रधाने, विनोद मोटे, बाबू बनसोडे, दादा सुरवसे, धीरज बावधनकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *