शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाग सात मध्ये रॅली द्वारे वातावरण भगवेमय

अमोल बापु शिंदे, अनीकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि मनिषा कणसे यांच्या रॅलीस युवकांसह लाडक्या बहिणींची तुफान गर्दी
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि ११जानेवारी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ प्रभाग क्रं. ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे व युवानेते अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि मनीषा कणसे यांचे प्रचारार्थ रविवार दि. ११ जानेवारी सकाळी ११.३० वाजता पदयात्रेनं प्रारंभ करण्यात आला.
थोरला मंगळवेढा तालीम येथून रॅलीस प्रारंभ झाला, या रॅलीमध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती, अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक, थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य, संकेत परिवारचे सर्व सदस्य, अमोल बापू शिंदे मित्रपरिवार मोठ्या संखेन उपस्थित होते.





यावेळी माहिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती ही पदयात्रा पिंपळा मारुती नवजवान गल्ली,माळी गल्ली, काळी मजीद, बाजीअण्णा मठ,पत्रा तालीम,सळई मारुती,गवंडी गल्ली,मल्लिकार्जुन मंदिर परिसर कुंभारवाडा पंजाब तालीम, चौपाड, शिंदे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक निराळे वस्ती अवंती नगर यश नगर यासह प्रभागातील सर्व भागांमध्ये करण्यात आली.

रॅलीमध्ये ठीक ठिकाणी अमोल बापू शिंदे तसेच सर्व उमेदवारांचं औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात येत होत्या. अनेकांनी पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरून त्यांचं स्वागत केलं.
एकनाथ शिंदे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण पसरलं होतं, आपण केलेल्या कामाची पावती आपणास सुज्ञ मतदार राजा देईल तसेच लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास अमोल बापू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
युवकांचा तसेच लाडक्या बहिणींचा उदंड प्रतीसाद रॅलीस मीळाला या रॅलीमध्ये ज्ञानेश्वर सपाटे संकेत भाऊ पिसे प्रकाश अवस्थी पृथ्वीराज दीक्षित कणसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.