प्रभागात अनेक विकास कामे झाली ; आता स्मार्ट प्रभाग करणार – अमोल शिंदे

नागरिकांनी साथ देण्याचं केलं आवाहन ; महिलांनी ओवाळणी करत केले स्वागत
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.७ डिसेंबर
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले असून शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रभाग क्रं. ७ मधील शिवसेना पक्षाचे उमेदवार अनिकेत(दादा)शिवाजीराव पिसे,मनिष (ताई) विशाल कणसे, मनोरमा (ताई) ज्ञानेश्वर सपाटे, अमोल(बापू)बाळासाहेब शिंदे यांच्या प्रचारार्थ अवंती नगर, अभिमान श्रीनगर १-२, यशनगर १-२, व परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या पॅनलचे स्वागत करत त्यांना पाठबळ दिल्याचे दिसून आले.

यावेळी अमोल शिंदे म्हणाले, प्रभागाचा विकास झाला आहे. हा प्रभाग आणखीन स्मार्ट करण्यासाठी तसेच या भागातील नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी बागेची मागणी केली जात आहे. भविष्यकाळात येथे त्यासाठी जरूर प्रयत्न करू. मात्र प्रभागातील नागरिकांनी साथ दिल्यास ते शक्य होईल असे ही त्यांनी सांगितले.