राजमुद्रा वसुंधरा आणि ओझस सोसायटी सी.एन.एस. हॉस्पिटल परिसरात होम टू होम प्रचारामध्ये गणेश वानकर यांच्या पॅनलने घेतली आघाडी



सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ डिसेंबर
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी होम टू होम प्रचार,लाडक्या बहिनींच्या बैठका, पदयात्राच्या माध्यमातून चांगलाच जोर पकडला आहे. दररोज उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते प्रभागातील प्रत्येक घर पिंजून काढत आहेत.पायाला भिंगरी लावून भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचून विकास कामे सांगत आहेत.
दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील शेटे नगरवासीयांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्या शब्दाला मान देत भाजपाचे उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी एकमुखी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.विकासाच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरभरून मते देण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला.

यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी रमेश गुजर, विजय तडसरे, आप्पासाहेब पाटील, महादेव जन्मले, बाळासाहेब पाटील, महेश हेळवे, अरुण भोसले आदींची उपस्थिती होती.