प्रभाग क्रमांक २४ मधील जनतेचा साधला विकास ; काँग्रॅटीकरणाच्या जंगलात दिले आरोग्यदायी जीवन
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.८ डिसेंबर
जुळे सोलापूर प्रभाग क्रमांक २४ मधील जानकी नगर बाग म्हणजे खऱ्या अर्थाने जुळे सोलापूर वासियांची ‘फुफ्फुसे’ आहेत. वाढत्या काँक्रिटीकरणाच्या काळात नागरिकांना शुद्ध हवा, आरोग्यदायी वातावरण आणि विरंगुळ्याची जागा मिळावी या दृष्टीने माजी उपमहापौर राजेश काळे यांनी या बागेचा कायापालट केला.

पूर्वी दुर्लक्षित अवस्थेत असलेली जानकी नगर बाग काळे यांच्या दूरदृष्टीतून अत्याधुनिक, सुसज्ज आणि आकर्षक सार्वजनिक उद्यानात रूपांतरित झाली. बागेमध्ये सर्वप्रथम सुसज्ज वॉकिंग ट्रॅक तयार करून सकाळ-संध्याकाळ फिरणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित व सुंदर व्यवस्था करण्यात आली. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी बसवून त्यांना खेळण्यासाठी स्वतंत्र, आनंददायी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभारण्यात आले, जेणेकरून वयोवृद्ध नागरिकही नियमित व्यायाम करू शकतील. रात्रीच्या वेळीही बाग सुरक्षित व प्रकाशमान राहावी म्हणून हायमास्ट दिवे बसवण्यात आले. संपूर्ण बागेला मजबूत वॉल कंपाऊंड करून भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार (गेट) उभारण्यात आले, ज्यामुळे बागेचा नावलौकिक वाढला.





सुरक्षेच्या दृष्टीने वॉचमनसाठी स्वतंत्र खोली बांधण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आणि ती झाडे जगवून बाग हिरवीगार करण्यात आली. आज जानकी नगर बाग केवळ फिरण्यासाठीची जागा न राहता, ती नागरिकांच्या आरोग्याची, सामाजिक भेटीगाठींची आणि पर्यावरण संवर्धनाची केंद्रबिंदू बनली आहे.
संपूर्ण सुसज्ज जानकी नगर बाग म्हणजे सोलापूर वासियांचे एक स्वप्नच होते, आणि ते स्वप्न मा. राजेश काळे यांनी प्रत्यक्षात उतरवले. आज ही बाग जुळे सोलापूरची ओळख बनली असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.
विकास नवनाथ कदम
प्रभाग क्रमांक २४ – ड सर्वसाधारण (जुळे –सोलापूर)
श्री विकास नवनाथ कदम हे प्रभाग क्रमांक २४ मधील एक कर्तव्यदक्ष, अभ्यासू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जुळे –सोलापूर परिसरामध्ये त्यांनी सामाजिक, क्रीडा तसेच विविध सार्वजनिक क्षेत्रांत दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.
सामाजिक कार्य
गरीब, गरजू व वंचित घटकांसाठी सातत्याने मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, आपत्तीच्या काळात मदतकार्य, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक सलोखा, एकोपा व सर्वसमावेशक विकास हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
क्रीडा क्षेत्रातील योगदान
तरुणाईला सकारात्मक दिशेने नेण्यासाठी क्रीडा हे प्रभावी माध्यम मानून त्यांनी विविध क्रीडा स्पर्धा, युवक क्रीडा महोत्सव, कबड्डी, क्रिकेट व अन्य स्थानिक खेळांचे आयोजन व प्रोत्साहन दिले आहे. अनेक होतकरू खेळाडूंना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले असून क्रीडेमुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण निर्माण व्हावेत, यासाठी ते सतत कार्यरत असतात.
तरुणांचा लाडका, लोकप्रिय चेहरा
साधी राहणी, स्पष्ट विचारसरणी आणि थेट संवादामुळे श्री विकास कदम हे तरुण युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, रोजगार, शिक्षण, क्रीडा व स्वयंरोजगाराच्या संधींसाठी मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते तरुणाईचा विश्वासार्ह व लाडका चेहरा बनले आहेत.
सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन
प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, सार्वजनिक सोयी-सुविधा आणि नागरी समस्यांबाबत ते नेहमी जागरूक राहतात. “सर्वसामान्य नागरिक शेवटचा घटक केंद्रस्थानी” ठेवून विकास घडवणे, ही त्यांची ठाम भूमिका आहे.
एकूणच, श्री विकास नवनाथ कदम हे सामाजिक बांधिलकी, क्रीडा प्रेम, तरुणाईशी घट्ट नाते आणि सर्वांगीण विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन असलेले प्रभाग क्रमांक २४ मधील आशादायी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
सतीश भगवान मस्के
पत्ता : उत्कर्ष नगर, इंदिरानगर
प्रभाग : २४ अ
प्रवर्ग : अनुसूचित जाती – सर्वसाधारण
श्री सतीश भगवान मस्के हे उत्कर्ष नगर व इंदिरानगर परिसरात सामाजिक कार्यासाठी परिचित व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा, ही त्यांची ठाम भूमिका असून अनुसूचित जातीतील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
शाहू–फुले–आंबेडकर चळवळीच्या विचारधारेचा कणा म्हणून त्यांनी सामाजिक समता, शिक्षण, स्वाभिमान व संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार केला आहे. सामाजिक न्याय, समान संधी व सशक्त समाजनिर्मिती हीच त्यांच्या कार्याची दिशा आहे. परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यांसाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करून ठोस योगदान दिले आहे.
विकासाभिमुख ध्येयदृष्टी ठेवून ते केवळ समस्या मांडण्यात नव्हे, तर त्यावर उपाय शोधण्यात विश्वास ठेवतात. तरुणांना सकारात्मक विचार, शिक्षण, क्रीडा व सामाजिक सहभागासाठी कायम प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. युवकांना नेतृत्वाची संधी देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
निस्वार्थ सामाजिक बांधिलकी, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका यामुळे श्री सतीश भगवान मस्के हे प्रभाग २४ अ मधील एक अभ्यासू, संवेदनशील व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून मानले जातात.
शैलजा प्रेमसिंग राठोड
ओबीसी महिला राखीव – प्रभाग क्रमांक २४
शिवसेना पुरस्कृत उमेदवार | निवडणूक चिन्ह : पंखा
सौ. शैलजा प्रेमसिंग राठोड या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक असून प्रभाग क्रमांक २४ मधील जनतेमध्ये त्या विश्वासार्ह, संवेदनशील व कामाशी निष्ठावान नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शिवसेनेच्या विचारधारेतून प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे.
महिलांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांना न्याय, सुरक्षा व सन्मान मिळवून देणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. बचत गट, रोजगार संधी, आरोग्य जनजागृती व महिलांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे या माध्यमातून त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
गोरगरीब, कष्टकरी, वंचित घटकांसाठी सौ. राठोड यांनी अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे या विषयांत त्या कायम पुढाकार घेतात. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ उपाययोजना करण्यावर भर देतात.
कोरोना महामारीच्या कठीण काळात सौ. शैलजा राठोड यांनी उल्लेखनीय कार्य केले. गरजू कुटुंबांना अन्नधान्य, औषधे, मास्क व आरोग्यविषयक मदत पुरवणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धीर देणे, प्रशासनाशी समन्वय साधून मदत पोहोचवणे या सर्व बाबींमध्ये त्यांची भूमिका मोलाची ठरली.
सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत भरीव आहे. व्यसनमुक्ती चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवले. अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी केवळ आयोजनच नाही तर स्वतः हिरिरीने रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला.
सौ. शैलजा प्रेमसिंग राठोड यांचे नेतृत्व हे संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख दृष्टी यांचे सुंदर मिश्रण आहे. प्रभाग क्रमांक २४ चा सर्वांगीण विकास, महिला-युवा-ज्येष्ठांचे हित आणि गोरगरीब जनतेचा सन्मान राखणे हेच त्यांचे ध्येय असून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून त्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहेत. म्हणून प्रभाग क्रमांक 24 मध्ये ओबीसी महिला संवर्गातून दावा करीत आहोत
सौ शैलजा प्रेम सिंग राठोड शिवसेना पुरस्कृत उमेदवार चिन्ह छताचा पंखा
माझी ओळख… माझी बांधिलकी…
प्रिय प्रभागातील माता-भगिनींनो, बंधूंनो,
मी सौ. उषा राजेश काळे तुमच्यातलीच एक,तुमच्या सुख-दुःखाशी नातं जपणारी,आणि तुमच्या विश्वासावर उभी राहू पाहणारी.माझे पती राजेश दिलीप काळे सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर असताना मी त्यांची कामगिरी अगदी जवळून पाहिली आहे.तो काळ केवळ पदाचा नव्हता,तो प्रभागाच्या परिवर्तनाचा काळ होता.रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता,आरोग्य सुविधा, प्रकाशयोजना,पर्यावरण संवर्धन आणि मूलभूत विकासकामे अनेक वर्षे अशक्य वाटणारी कामेत्यांच्या कारकीर्दीत प्रत्यक्षात उतरली.आज प्रभागाचा पाया भक्कम झाला आहे,आणि त्या पायावरपुढीलविकासाचा डोलारा उभा राहण्यासाठी मी पुढे येत आहे.मी राजकारणात येते आहेते केवळ पदासाठी नाही,तर सेवा, संवेदनशीलता आणि सातत्यया मूल्यांसाठी.आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात,लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्याया लोकाभिमुख नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपणही आपल्या प्रभागातविकासाचे नवे पर्व निश्चितच आणू शकतो,हा माझा ठाम विश्वास आहे.महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, वंचित घटक प्रत्येकासाठी न्याय,प्रत्येकासाठी संधी आणि प्रत्येकासाठी सन्मान हेच माझे ध्येय आहे.मला विश्वास आहे. तुमच्या प्रेमाची, तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या साथिची.ही लढाई माझी नाही,ही आपल्या सगळ्यांच्या भविष्याची लढाई आहे.आपलीच, सौ. उषा राजेश काळे
प्रभाग 24
प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार 24 अ सतीश भगवान मस्के अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग निशाणी धनुष्यबाण उषा राजेश काळे 24 ब अनुसूचित जमाती महिला एकमेव जात पडताळणी असणारे स्थानिक उमेदवार निशाणी धनुष्यबाण ओबीसी महिला प्रवर्ग शैलेजा प्रेमसिंग राठोड प्रभाग 24 क शिवसेना पुरस्कृत निशाणी छतावरील पंखा श्री विकास नागनाथ कदम सर्वसाधारण पुरुष 24 ड चिन्ह धनुष्यबाण