किसन भाऊंनी मैदान मारलं ; ठरले विजयाचे शिल्पकार

प्रभाग क्रमांक २२ मध्ये पहिल्यांदाच भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.१६ जानेवारी
सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ सदस्य संख्येसाठी महापालिकेची निवडणूक प्रदेशाची बनली होती. तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या निवडणुकांकडे उमेदवारांसह राजकीय नेत्यांचे आणि मतदारांचे लक्ष लागून राहिले होते. पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक २२ मध्ये यंदा कमल फुलले आहे. किसन जाधव यांच्या पॅनलने येथे दणदणीत विजय संपादित करत विजयश्री खेचून आणली आहे. विजय रॅली काढत किसन भाऊ आणि विजय उमेदवारांनी विजयाचा जल्लोष केला.

दरम्यानचा काळ किसन भाऊंसाठी अत्यंत क्लेशदायक ठरला. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्याला कडाडून विरोध केला. त्या विरोधाला झुगारून पक्षश्रेष्ठींनी किसन भाऊ यांच्या पॅनललाच उमेदवारी जाहीर केली. परंतु निष्ठावंतांनी बंडखोरी करत मैदानात उडी घेतली. स्वकीय तसेच परकीय आणि एकनिष्ठांची बंडखोरी अशा तिहेरी संकटात किसन भाऊ अडकले होते. मात्र त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांची साथ लाभली. योग्य रणनीती आणि व्यूहरचना विजयाचे फलीत ठरली. या विजयाचे शिल्पकार किसन जाधव हे ठरले.