मूलभूत सोई सुविधाना प्राधान्य देण्याचा निर्धार ; प्रभाग २२ मध्ये‎ भाजप उमेदवारांच्या‎ पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त‎ प्रतिसाद

मूलभूत सोई सुविधाना प्राधान्य देण्याचा निर्धार

प्रभाग २२ मध्ये‎ भाजप उमेदवारांच्या‎ पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त‎ प्रतिसाद

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर‎, दि.७ डिसेंबर 

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर‎ प्रभाग क्रमांक‎ २२ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत‎ उमेदवार‎ किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी,‎ अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली‎ शिवराज गायकवाड यांच्या‎ प्रचाराला‎ नागरिकांकडून‎ प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र‎ दिसून येत आहे.‎ मंगळवारी‎ सेटलमेंट‎ परिसरात पदयात्रा‎ व‎ मतदार‎ संवाद कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात‎ आले होते.

    ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ‎ व मार्गदर्शक‎ लक्ष्मण‎ जाधव‎ तसेच प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे‎ माजी नगरसेवक‎ नागेश गायकवाड‎ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ ही पदयात्रा पार‎ पडली.‎ यावेळी‎ लिमयेवाडी,‎ कावळा‎ गल्ली,‎ मंजुनाथ‎ नगर,‎ सनत‎ नगर‎ आदी‎ भागांमध्ये‎ नागरिकांच्या गाठीभेटी‎ घेत‎ त्यांच्या‎ समस्या,‎ सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात‎ आल्या.

 

     प्रचारादरम्यान पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे, आमदार विजयकुमार‎ देशमुख,‎ आमदार सुभाष‎ देशमुख‎ आणि आमदार‎ देवेंद्र‎ कोठे‎ यांच्या‎ माध्यमातून‎ प्रभागात राबविण्यात आलेल्या‎ विकासकामांची‎ माहिती‎ मतदारांशी संवादातून‎ देण्यात आली.‎ रस्ते, पाणीपुरवठा,‎ ड्रेनेज, वीज,‎ आरोग्य,‎ स्वच्छता आणि‎ पर्यावरण‎ विषयक‎ कामांना पुढील काळात प्राधान्य दिले जाईल, असे उमेदवारांनी‎ सांगितले.‎ पदयात्रे दरम्यान‎ नागरिकांनी स्थानिक‎ प्रश्न‎ मांडत‎ भविष्यातील विकासाबाबत‎ अपेक्षा व्यक्त‎ केल्या.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *