किसन भाऊंच्या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; आबालवृद्धांनी दिले आशीर्वाद

प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.६ डिसेंबर 

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी,अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे. या अनुषंगाने मंगळवारी सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ व मार्गदर्शक लक्ष्मण जाधव तसेच प्रभाग क्रमांक २२ चे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली.

वृद्ध महिलांचा घेतला आशीर्वाद 
जनतेला पटवून देताना किसन भाऊ
मतदार महिला ओवाळताना 

     यावेळी लिमयेवाडी, कावळा गल्ली, मंजुनाथ नगर, सनत नगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध कामांची माहिती मतदारांशी संवादातून मांडण्यात आली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यातून प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी तसेच सर्व समाजघटकांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उमेदवारांनी सांगितले की, प्रभागातील सर्व समाजघटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण विषयक प्रश्नांवरही पुढील काळात प्राधान्याने काम केले जाईल. दरम्यान, नागरिकांनीही आपल्या मनोगतातून प्रभागातील विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत भविष्यातील विकासाबाबत अपेक्षा मांडल्या. यापदयात्रेवेळी नागरिकांनी विविध स्थानिक प्रश्न मांडले असून या संवादातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *