किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. २२ येथे ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर, दि.०७ जानेवारी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खा.सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या हेड अंतर्गत ८ लाख ९८ हजार ६९२ रुपये खर्चित प्रभाग क्रमांक २२ येथील रामवाडी अंबाबाई देवी मंदिरच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ड्रेनेज लाईनची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली होती. ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच साचत होते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळत होते. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ या परिसरात ड्रेनेज लाईनचे कामासाठी प्रयत्न सुरू झाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं.
या ड्रेनेज लाईनच्या उद्घाटन प्रसंगी सुनिता कांबळे, मालती सारवडकर, नूरजहा शेख, सुवर्णा शितोळे, सीता शितोळे,मीना बनसोडे, दीपा स्वामी, वत्सला गायकवाड, विमलताई कांबळे, सुनंदा माळंत्री, सुदर्शन माळगे, सखुबाई कांबळे, दत्तात्रय डोंगरे, सागर कांबळे, शंकर गायकवाड, बाळासाहेब शितोळे, प्रदीप गायकवाड,दीपक गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.