प्रभाग २१मध्ये काँग्रेस उबाठाचे वाढते मताधिक्य ठरतेय डोकेदुखी ; भाजपने सोडला का वाऱ्यावर ? ना कार्यालय ना प्रचाराचे उद्घाटन ना की उमेदवारांची ओळख कशी होणार फाईट

प्रभाग क्रमांक २१ मध्ये काँग्रेस आणि उद्धवसेनेचे वाढते मताधिक्य ; भाजपला ठरतेय डोकेदुखी 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.७ डिसेंबर 

सोलापूर पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले, सर्वत्र प्रचाराच्या रॅली, पदयात्रा, होम टू होम प्रचार सुरू झाला आहे. प्रभागात महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये काँग्रेस उमेदवाराचे वजन वाढत असताना दुसरीकडे भाजप उमेदवारच जनतेला माहीत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव सेनेचे मताधिक्य वाढत असल्याचे दिसत आहे.

पूर्वाश्रमीचा शिवसेनेचा झंजावात या प्रभागात होता. मात्र २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या याच उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यावेळी देखील काँग्रेसचे पॅनल विजयी झाले होते. मात्र यंदाचे इलेक्टिव्ह मेरिट पाहिले असता महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

दरम्यान आघाडीचे उमेदवार प्रतीक्षा निकाळजे, किरण टेकाळे, रियाज हुंडेकरी आणि भीमाशंकर म्हेत्रे प्रचारात व्यस्त असल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन विविध विकास कामांसाठी आघाडीच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. गतवर्षी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्याने विजय केले होते. यंदाच्या वर्षी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.

आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने उद्धवसेनेचे मताधिक्य वाढत असल्याने भाजपला डोकेदुखीचा विषय बनला आहे. भाजप उमेदवारांचे अजूनही प्रभागात पाऊल पडले नसल्याने भाजपकडून नेमके कोणते उमेदवार उभारले आहेत. याचा मागमूस या प्रभागातील नागरिकांना नसल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवारांच्या कार्यालयाचे ठाव ठिकाण नाही. तसेच प्रचाराचे उद्घाटन देखील झाले नसल्याने हा प्रभाग भाजपने वाऱ्यावर सोडला आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *