भाजपाचा प्रभाग 12 मध्ये विजयी संकल्प ; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद…
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ डिसेंबर
प्रभाग १२ येथील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उमेदवार कोंड्याल विनायक रामकृष्ण, खजुरगी सारिका सिद्धराम, वडनाल अर्चना राजू, कमटम सिद्धेश्वर रायमल्लू यांच्या विजयी संकल्प रॅली आज सुनील नगर, आशा नगर, कलावती नगर, समरा नगर, विनायक नगर, शिवलिंग नगर, सिद्धरामेश्वर नगर परिसरातून अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

देव देश धर्मासाठी निघालेल्या ह्या विजयी संकल्प पदयात्रेत प्रभागातील भारतीय पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात, भारतीय जनता पार्टीचा जयघोष करत,लोकांना कमळ चिन्हावर भरगोस मतदान करण्याचा आव्हान करत पार पाडला.

ह्याप्रसंगी प.पू अभिनव रामलिंग महास्वामीजी, प.पु, महामृत्युंजय महास्वामीजीं, मैंदर्गी नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्षा सौ.अंजली ताई बाजारमठ, नूतन नगरसेविका सौ सुरेखाताई होळीकट्टे यांच्यासोबतच भाजपा वर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या स्वरूपात उपस्थित होते.

प्रभाग 12 मधून निवडणुकीच्या रिंगणात अ – कोंड्याल विनायक रामकृष्ण ब – खजुरगी सारिका सिद्धरामक – वडनाल अर्चना राजू ड – कमटम सिद्धेश्वर रायमल्लू तुल्यबळ उमेदवार असून या उमेदवारांना साथ देऊन विजय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.