प्रभाग क्र. १२ मध्ये कष्टकरी कामगारांसाठी महापालिकेचे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी

प्रभाग क्र. १२ मध्ये कष्टकरी कामगारांसाठी महापालिकेचे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी

सुनील नगर, नीलम नगर, कलावती नगरसह परिसरातील हजारो नागरिकांना होणार मोठा दिलासा

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१० मार्च

सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२ मध्ये कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. या भागातील बहुतांश नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे या परिसरात महापालिकेच्या वतीने सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

या संदर्भात प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका सारिका सिद्धाराम खजूरगी यांनी महापौर विनायक कोंड्याल यांशी चर्चा करून त्या संदर्भात त्या विषयासंदर्भात निवेदन देण्यात येईल. प्रभागातील सुनील नगर, नीलम नगर, कलावती नगर, विनायक नगर, अविनाश नगर, हडपद नगर, संगमेश्वर नगर यांसह अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कष्टकरी कामगार व रोजंदारीवर काम करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. या कष्टकरी कामगारांना खरंच या आरोग्य आरोग्य केंद्राची गरज असून त्याची उभारणी अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी त्यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

 

सध्या या परिसरात महापालिकेचे कोणतेही सुसज्ज आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना लहान-मोठ्या आजारांसाठी दूरवर जावे लागते किंवा खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे कष्टकरी कामगारांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

प्रभाग क्रमांक १२ मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रशस्त व सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आल्यास परिसरातील नागरिकांना विनामूल्य किंवा अल्पदरात वैद्यकीय सेवा, प्राथमिक उपचार, तपासण्या आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महापालिकेच्या आरक्षित जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सारिका खजूरगी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *