प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामांचे उद्घाटन ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणणार-किसन जाधव…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१ एप्रिल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगर पालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत (सन२०२४-२५ ) १० लाख ९७ हजार १५६ रुपये खर्चित प्रभाग २२ येथील मातंग समाज स्मशानभूमी ते सोनी नगर रस्ता मोदी हुडको येथील कॉंक्रिटकरण कामाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की, प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीमध्ये घटक पक्ष आहे महायुतीतील घटक पक्षांना पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांनी आम्हाला सहकार्याचे भूमिका दाखविले. यामुळे प्रभागातील नागरिकांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणखीन भरघोस निधी आणून प्रभागाचा चौफेर विकास होणार आसल्याचे सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी ज्योती बाबुराव संगेपाग,शकुंतला कोटमाळे, चंद्रमा ओलेकर,सविता ताई बंगले, महालक्ष्मी म्हेत्रे, मुक्ता वागळे, तनुजा पवार, सिद्धम चलवादी, हरीश तेलुगु, राजू पवार,आर्यन साळुंखे, नागेश म्हेत्रे, जगदीश सोनेरीकर, सचिन किसन गायकवाड,वसंत पवार, नागेश ढेंगळे,नारायण धुमाळ मोहन पवार आदीं उपस्थित होते.