प्रभाग ९ मधील भाजप उमेदवारांना मिळतेय जनतेचे पाठबळ

प्रभाग ९ म्हणजे आमचे कुटुंब, कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांची काळजी घेणे माझे पहिले काम – पूजा श्रीकांत वाडेकर

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.११ जानेवारी

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने होम टू होम प्रचार सुरू असून सामाजिक कार्यकर्त्या पूजा श्रीकांत वाडेकर ह्या निवडणूक रिंगणात आहेत, भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग नऊ मध्ये होम टू होम प्रचारावर भर देण्यात येत आहे, आणि नागरिकांशी संवाद साधत त्याच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत, ठिकठिकाणी उमेदवार पूजा श्रीकांत वाडेकर यांच्यासह तिन्ही उमेदवारांचे फुलांच्या पायघड्या घालून फटाके फोडून तसेच औक्षण करून स्वागत करण्यात येत आहे.

 

होम टू होम प्रचार केल्यामुळे नागरिक आनंदीत होत असून आपुलकीने आमच्यासोबत संवाद साधत आहेत, आपल्या अडीअडचणी सांगत आहेत, प्रभाग ९ म्हणजे आमचे कुटुंब आहे, आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेणे हे पहिले माझे काम असून येणाऱ्या काळात आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ९ मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे उमेदवार पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सांगितले, त्यामुळे प्रभाग ९ मधील जनतेने जास्तीत जास्त मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन पूजा श्रीकांत वाडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *