प्रभाग क्रमांक २६ मधील प्रियांका नगर ते विश्व सोसायटी येथे रस्त्याचे काम सुरू…
प्रतीनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ जून
जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक २६ मधील प्रियांका नगर ते विश्व सोसायटी येथे रस्त्याचे कामाला अखेर सुरुवात झाली आहे. येथील माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नला यश आले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २६ मधील प्रियांका नगर ते विश्वसोसायटी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव होता. येथे राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या कुठल्याच सोयी सुविधा नव्हत्या. प्रभागाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर नगरातील नागरिक यांनी समक्ष भेटून निवेदन दिले होते. याच निवेदनाची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन सुविधांची मागणी केली.
याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईनसह शासनाच्या सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओबासे यांच्याकडे रस्त्यासंबंधी मागणी केली असता आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचित करत सदरचे रस्त्याचे काम सुरू केले असून लवकरच तेथील नागरिकांची रस्त्याबाबतची गैरसोय दूर होणार असल्याने तेथील नागरिकांमध्ये आनंद आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी तेथील नागरिकांनी विविध सुविधा उपलब्ध केल्याबद्दल माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदीसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.