ठेकेदारांनी कोणतेही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करावे किसन जाधव यांचे आवाहन ….रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन 

प्रभाग क्रमांक २२ परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन 

 ठेकेदारांनी कोणतेही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करावे किसन जाधव यांचे आवाहन 

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ जून

सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत १८ लाख २८ हजार रुपये खर्चित येथे यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

       दरम्यान, यतिम खाना परिसरात बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. येथील रहिवाशांच्या मागणीनुसार रस्ता कामाची सुरुवात करण्यात आली. विकास कामांमध्ये गुणवत्ता हा सर्वोच्च निकष असावा, ठेकेदारांनी कोणतेही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करावे असा, सल्लाही यावेळी किसन जाधव यांनी  ठेकेदारांना दिला.

        याप्रसंगी एजाज शेख, महबूब पठाण, इरफान शेख, बिलाल शेख, जुबेर शेख, जमीर शेख,मोहीम शेख, कुरेशी, निराशा शेख, मीराशाब शेख, उमर शेख, जब्बार शेख,, सय्यद चाचा, सद्दाम शेख, केशर मणियार, शामला जाधव,अन्नपूर्णा जाधव, शहजाद शेख,मालानबी शेख, बिलाल शेख, रियाज शेख, सलीम शेख, महादेव राठोड,वसंत कांबळे,फिरोज पठाण, आनंद गाडेकर, सुहास जाधव आदींच्या उपस्थितीत या रस्ता कामाचे विधिवत पूजन करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *