उच्चशिक्षित कुणाला गायकवाड सोडतायेत जनतेच्या मनावर वेगळी छाप ; जनतेच्या हाकेला धावून येणारा जनसेवक म्हणून होतीय ख्याती

प्रभाग क्र. २२ येथे समाजसेवक कुणाल गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे विकासकामांना मिळते गती
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ डिसेंबर
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे वारे शहर परिसरात जोरात वाहत आहे.शहराच्या हद्दवाढ भागातील अनेक प्रभागात आजी माजी नगरसेवक आणि इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. मात्र आपला प्रभाग समजून कार्य करणारे जनसेवक मोजकेच आहेत. शहराच्या विजापूर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक २२ मध्ये जनसेवक उच्चशिक्षित कुणाल देवीदास गायकवाड यांनी आपली एक वेगळीच छाप जनतेच्या मनात निर्माण केली आहे. प्रभागातील जनतेच्या हाकेला धावून येणारा युवा कार्यकर्ता अशी वेगळी ओळख कुणाल देवीदास गायकवाड यांची होत आहे. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेत नगरसेवक पद नसताना अनेक विकास कामे पार पाडली आहेत. त्यामुळे जनतेचे पाठबळ कुणाल यांना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


दरम्यान, दिगंबर ज्वेलर्स शिवाजी कोकरे घर गरिबी हटाव दोन नंबर झोपडपट्टी येथे ड्रेनेज ब्लॉकेज काढणे, दिगंबर ज्वेलर्स शिवाजी कोकरे घर गरिबी हटाव नंबर दोन झोपडपट्टी यांच्या दुकानासमोर दोन चेंबर चोकअप झालेले होते, चेंबर मध्ये ब्लॉकेज असल्याने चेंबर ओवर तसेच घरात बॅक फ्लो होत होते, नागरिकांत कडून ही समस्या जाणून घेऊन समाजसेवक कुणाल देविदास गायकवाड यांनी जेटिंग मशीनद्वारे ब्लॉकेज काढून चेंबर ओव्हर फ्लो आणि बॅक फ्लो ची समस्या सोडविण्यात आले.

तसेच रेवण सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे पिण्याचे पाणी गळती दुरूस्ती करून नूतन जलवाहिनी द्वारे पाण्याची सोय करण्यात आली. हातपंप दुरुस्ती करून पाण्याची सोय केली. सेटलेंट कबड्डी ग्राउंड समोरील, सार्वजनिक शौचालय लगत हॅण्डपंप दुरुस्ती करण्यात आले. यासह बंद पडलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करून दिव्यांची सोय केली आहे. जनतेच्या मागणी अनुसार बंद पडलेले स्ट्रीट लाईट चालू करण्यात आले. जनसेवेचा वारसा घेऊन निघालेले कुणाल गायकवाड यांना प्रभागातील जनतेची साथ आवश्यक असून, कार्यशील तसेच तत्पर जनसेवकाला महापालिकेत पाठवण्याचे आवाहन या निमित्ताने केले जात आहे.

उच्चशिक्षित जनसेवक “कुणाल देविदास गायकवाड” यांनी कोणतेही पद नसताना प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन सामान्या नागरिकांचा प्रश्न सोडविण्याचा सतत प्रयत्न केला. तसेच खा.प्रणिती शिंदे यांच्या निधीतून देखील विविध विकासकामे साध्य केली. प्रभाग क्रमांक २२ मध्ये युवा तसेच विद्याविभूषित तरुणांना संधी दिली पाहिजे तरच प्रभागाचा पर्यायाने नागरिकांचा चौफेर विकास होईल, असे प्रांजळ मत स्थानिकांमधून व्यक्त केले जात आहे.