प्रभाग २२ येथील २ नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांद तारा मज्जिद रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन
प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न-किसन जाधव
सोलापूर महानगरपालिकेत प्रशासक असून देखील अजित पवारांच्या माध्यमातून किसन जाधवांचा विकास कामांचा धडाका सुरूच-माजी नगरसेवक पैगंबर शेख

सोलापूर व्हिजन न्युज,
प्रतिनिधी
प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रस्त्याच्या बाबतीमध्ये स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी २ नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

दरम्यान सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरविणे सन २०२३-२४ अंतर्गत ४२ लाख २७ हजार ६४९ रुपये खर्चित २ नंबर झोपडपट्टी येथील चाॅदतारा मज्जिद ते आम्रपाली चौक पर्यंत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.


याप्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख, शहाजान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,मनसुद शेख, इकबाल मुल्ला, एम सलीम शेख, असद शेख, चांद शेख, वसीम मुल्ला, कमलीवाले,अशपाक कुरेशी,उस्मान मुल्ला, सादिक कुरेशी, साहिल शेख, असद मुल्ला, शाहिद मुल्ला, मनसुद मुल्ला, राजमत मुल्ला, मौला पटेल, रवी गायकवाड, सिद्राम सलगर आदींची उपस्थिती होती.