महिलांसह‎ मुस्लिम‎ बांधवांचा सहभाग; सामाजिक‎ एकतेचा‎ किसन भाऊंचा असाही संदेश

प्रभाग‎ २२ मध्ये‎ भाजप उमेदवारांची रामवाडीतील गैबीपीर नगरात पदयात्रा

महिलांसह‎ मुस्लिम‎ बांधवांचा सहभाग; सामाजिक‎ एकतेचा‎ संदेश

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर‎, दि.७ डिसेंबर 

सोलापूर‎ महानगरपालिका‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर‎ प्रभाग‎ क्रमांक २२ मधील‎ भारतीय जनता पार्टीचे अधिकृत‎ उमेदवार किसन‎ जाधव, दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ. अंबिका‎ नागेश गायकवाड‎ व सौ.‎ चैत्राली‎ शिवराज गायकवाड यांच्या‎ प्रचाराला‎ मतदारांकडून उत्स्फूर्त‎ प्रतिसाद मिळत असल्याचे‎ चित्र सध्या प्रभागात दिसून येत‎ आहे.‎ याच अनुषंगाने‎ बुधवारी‎ रामवाडी परिसरातील‎ गैबीपीर‎ नगर व लगतच्या‎ भागात‎ पदयात्रा व‎ मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले‎ होते. या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम समाज‎ बांधवांची‎ मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे‎ सामाजिक एकतेचा‎ सकारात्मक संदेश‎ नागरिकांपर्यंत‎ पोहोचला.

 

माजी‎ नगरसेवक‎ नागेश गायकवाड तसेच लक्ष्मण जाधव‎ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली‎ ही पदयात्रा‎ पार‎ पडली.‎ प्रशासन‎ राजवटीच्या‎ काळात नागरिकांना भेडसावलेल्या विविध‎ अडचणी,‎ मूलभूत सुविधांतील त्रुटी‎ तसेच‎ त्या सोडवण्यासाठी‎ करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी मतदारांशी संवाद‎ साधत मांडण्यात‎ आला. आमदार‎ देवेंद्र कोठे‎ यांच्या माध्यमातून तसेच‎ महायुती सरकारच्या सहकार्यातून प्रभाग‎ २२‎ साठी‎ कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध‎ झाल्याने‎ रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता‎ आदी कामांना‎ गती‎ मिळाल्याचेही सांगण्यात आले.

 

पुढील‎ काळात‎ आरोग्य‎ सुविधा बळकट करणे,‎ ज्येष्ठ नागरिकांसाठी‎ उद्यान,‎ बालगोपालांसाठी‎ चिल्ड्रन पार्क तसेच‎ स्वच्छता‎ विषयक‎ भरीव कामे‎ करण्याचा‎ मानस किसन जाधव यांनी‎ व्यक्त‎ केला.‎ लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना भविष्यात‎ अधिक लाभ‎ मिळावा, यासाठी‎ शासन‎ दरबारी‎ प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल,‎ असेही त्यांनी‎ नमूद केले.‎ विकासाच्या जोरावर‎ पुन्हा‎ एकदा‎ प्रभाग‎ २२ चे नेतृत्व करण्याची‎ संधी द्यावी व मतदानाच्या रूपाने‎ आमच्या पाठीशी‎ ठामपणे उभे राहावे,‎ असे‎ आवाहनही‎ यावेळी किसन जाधव यांनी‎ मतदारांना केले. या‎ पदयात्रेमुळे‎ विकास,‎ सामाजिक सलोखा‎ आणि विश्वासाचे वातावरण‎ अधिक दृढ‎ झाल्याचे दिसून आले.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *